गोहत्‍या थांबवण्‍यासाठी सोलापूर येथे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्‍हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करू नयेत, या मागण्‍यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

भाजपच्‍या १५२ जागा निवडून येतील ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या राज्‍याच्‍या निवडणुकांमध्‍ये भाजपच्‍या ८० टक्‍के म्‍हणजे १५२ जागा निवडून येतील. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि महायुतीचे २०६ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील.

पुणे महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यास लाच घेतांना अटक !

महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्‍यासाठी ‘मीटर रिडर’ कर्मचारी उमेश कवठेकर याला २५ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना अटक करण्‍यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागात केली.

हिंदुत्‍वनिष्‍ठ हरि पाटणकर यांचा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !

प्रवेश केल्‍यावर श्री. हरि पाटणकर म्‍हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ, मराठी माणसांच्‍या भल्‍यासाठी, महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी, तसेच अनेक आंदोलने करून सामान्‍य माणसाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असल्‍याने मी त्‍यात सहभागी होण्‍याचा निर्णय घेतला आहे.’’

वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी विस्तृतपणे चर्चा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

काही दिवसांपूर्वी भारतातील एका तरुणाच्या प्रेमात पडलेली एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह भारतात पळून आली होती. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्रालयातील ६०२ क्रमांकाच्या कक्षात बसण्यास नकार !

अजित पवार यांनी घडलेल्या नकारात्मक घटना लक्षात घेत मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील ६०२ कक्षात बसण्यास नकार दिला. याविषयी अंनिसवाले आणि पुरो(अधो)गामी यांना काय म्हणायचे आहे ?

‘ओह माय गॉड २’ चित्रपटावर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून आक्षेप !

चित्रपटातील काही संवाद आणि दृश्य यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या शक्यता !
पुनरावलोकन समितीच्या मान्यतेनंतरच चित्रपट होऊ शकणार प्रदर्शित !

ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयातील जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य करा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांना आवाहन !