वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव १६ ते २२ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित करण्‍यात आले होते. अधिवेशनाच्‍या सहाव्‍या दिवशी, म्‍हणजे २१ जून या दिवशी महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी येथे देत आहोत.

संभाजीनगर येथे अडीच मासांचे बाळ ५ लाख रुपयांत विकले !

२० जूनच्‍या सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप राऊत (वय ५२ वर्षे) आणि त्‍याची पत्नी सविता यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून आश्रमावर बंदी घातली आहे.

वारकर्‍यांसाठी महाराष्‍ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !

या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्‍यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्‍व आल्‍यास १ लाख आणि अंशत: अपंगत्‍व आल्‍यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्‍या कालावधीत आजारी पडल्‍यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल

मुख्‍यमंत्र्यांच्‍या दसरा मेळाव्‍याविषयी याचिकाकर्त्‍याला प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे न्‍यायालयाचे आदेश !

या कार्यक्रमासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च झाला, असा आरोप याचिकाकर्त्‍याने केल्‍याने न्‍यायालयाने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

मांजरी (छत्रपती संभाजीनगर) येथील धार्मिक कार्यक्रमातील जेवणामधून विषबाधा !

या कार्यक्रमामध्‍ये दुपारी अनेक जणांनी जेवण केले. रात्री हेच जेवण कुटुंब आणि नातेवाईक यांनी पुन्‍हा केल्‍यानंतर त्‍यातील १६ जणांना जुलाब आणि उलटी यांचा त्रास चालू झाला.

मुंबईत महामार्गावर घोड्यांची शर्यत लावणार्‍या चौघांना अटक !

या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली आहे. इतर वाहनेही या महामार्गावरून धावत होती. या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. अन्‍यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

अमरावती येथे विवाहितेचे लैंगिक शोषण करून फेसबुकवरून ३५ तुकडे करण्‍याची धमकी !

पीडितेचे पतीविरोधात कौटुंबिक छळाचे प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट आहे. त्‍यातच मयूर नावाच्‍या युवकासमवेत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्‍या कालावधीत मयूरने पीडितेचे लैंगिक शोषण केले.

शहापूर तालुक्‍यात आदिवासी विकास महामंडळाच्‍या धान्‍य खरेदीत १३७ कोटी रुपयांचा घोटाळा !

या प्रकरणी शासनाच्‍या निधीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्‍याचा ठपका ठेवत प्रादेशिक व्‍यवस्‍थापक विजय गांगुर्डे आणि अन्‍य ३ अधिकारी यांना निलंबित करण्‍यात आले आहे.

पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला

चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी याला ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : ‘पॉक्सो’अंतर्गत ३ संशयितांना अटक

रत्नागिरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला यज्ञेश धनावडे, प्रतीक ताम्हणकर, आणि रूतिकेश शिंदे या तिघांनी लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.