निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे विद्यार्थ्यांना वारंवार जुलाबाचा त्रास !

संचालकांनी आश्वासने देऊन काय उपयोग ? विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच नोंद का घेतली नाही, हे सांगावे ! विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हानीला उत्तरदायी असणार्‍या संचालकांवरही कारवाई व्हायला हवी !

ISIS : ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांकडून दरोडा घालून बाँबचे साहित्य खरेदी केल्याचे ‘ए.टी.एस्.’च्या अन्वेषणात उघड !

ए.टी.एस्.ने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या शहानवाज खान, महंमद युनूस महंमद याकू आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !

प्रत्येक वर्षी १ सहस्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५ वर्षांत ही योजना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या नियमितच्या वेळेसह आठवड्यातील ३ घंटे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या कामाचे ८ घंटे होण्याची शक्यता !

५० टक्क्यांपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांना १२ घंटे कामावर उपस्थित रहावे लागते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचे ८ घंटे होण्याविषयी मोठी चर्चा झाली; परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यांना १२ घंटे कामावर यावे लागत होते.

बिसूर (जिल्हा सांगली) येथील अनधिकृतपणे बांधलेल्या मशिदीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?

पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि त्र्यंबके यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात पहाणी करून अहवाल सादर करण्याच्या संदर्भात श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट केला असून त्यावर सुनावणी चालू आहे.

‘मंगळ ग्रह सेवा संस्थे’ला महाराष्ट्र शासनाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान !

संस्थेच्या वतीने धार्मिकतेसह नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जातात

गोरक्षकांना मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित आणि पशूवधगृह बंद करण्याची मागणी !

बोदवड (जिल्हा धुळे) येथील गोरक्षक संजय शर्मा यांचे ३ दिवसांपासून ‘आमरण उपोषण’ चालू !

स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

येथे युवतींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ‘मुलींची सद्यःस्थिती आणि हिंदु धर्माची महानता’ या विषयावर त्या बोलत होत्या.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात संपूर्ण दिवस मुखदर्शन चालू ठेवण्याची हिंदु महासभेची मागणी !

१५ मार्चपासून श्री विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाच्या सुशोभिकरणासाठी मंदिरातील पदस्पर्श दर्शन बंद होणार असल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे. स्थानिक व्यापारी, दुकानदार यांची उपासमार होणार आहे.