कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे योग्य नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूचा संसर्ग अल्प होत आहे, तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण करण्याविषयी सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सुरूंग स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करू ! – निगुडे ग्रामस्थांची चेतावणी

खनिजांच्या अतीउत्खननामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित उपाययोजना प्रशासनाने स्वतःहून करायला हव्या होत्या ! प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद, तर कोकणात प्रतिसाद नाही

केंद्रसरकारने कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी घोषित केलेल्या ‘बंद’ला मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते ‘बंद’मध्ये सहभागी झाले होते.

आंबोली येथे ११ डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा होणार

११ डिसेंबर या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या दिवशी सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी पर्वतपूजन आणि मार्गदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ‘आदर्श पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचे स्मारक व्हावे, यासाठी सतत २५ वर्षे पाठपुरावा करून स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार्‍या सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला यावर्षीचा मानाचा समजला जाणारा ‘रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

लोकलमध्ये महिलेशी गैरवर्तन करणार्‍याला दोन वर्षांच्या कारागृहाची शिक्षा

कर्जत-सी.एस्.एम्.टी. लोकलमधून प्रवास करतांना महिलेशी गैरवर्तणूक करणार्‍यास न्यायालयाने दोन वर्षांच्या कठोर कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.

राहुल गांधी यांना समजून घेण्यास शरद पवार न्यून पडले ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे.=बाळासाहेब थोरात

टॉप्स सिक्युरिटी’ आस्थापनाचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंद

महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यातील कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे.

अपंग विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबवा ! – मुंबई उच्च न्यायालय

दूरदर्शनवरून शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवावा, = मुंबई उच्च न्यायालय.

नवी मुंबई महानगरपालिकेची १५ डिसेंबरपासून मालमत्ताकर अभय योजना

मालमत्ताकर धारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनी ‘मालमत्ताकर अभय योजना २०२०-२१’ घोषित केली आहे.