लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना कह्यात घेतले

भ्रष्ट अधिकार्‍यांना कह्यात घेणे, चौकशी करणे आदी जुजबी कारवाई करून न थांबता अशा भ्रष्टाचार्‍यांकडून भ्रष्टाचाराचा सर्व पैसा वसूल करावा !

२८ नोव्हेंबरपासून प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन !

कार्तिकी यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २५ ते २७ नोव्हेंबर असे ३ दिवस पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद करण्यात आले होते

कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच माणगाव हायस्कूल चालू केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आरोग्य धोक्यात 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांनी माणगाव हायस्कूल चालू केले.

कुडाळ येथील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करतांना कुडाळ तालुक्यामध्ये भूमीचा मोबदला देण्याची २३ प्रकरणे प्रलंबित आहेत.

सिंधुदुर्गात १ डिसेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम

जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम राबवण्याकरता ७ लाख ३४ सहस्र ३१४ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण ‘आशा’ स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र २५१ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटला भेट

सिरम इन्स्टिट्यूट, एस्ट्रा झेनका, तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्त विद्यमाने या लसीचे निर्मितीचे कार्य हाती घेतले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. येथे आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती करण्यात आली आहे.

बी.एच्.आर्. पतसंस्था घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या धाडी

ठेवीदारांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलीस यांकडे या घोटाळ्याप्रकरणी ३ गुन्हे नोंद आहेत. अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील येथील घरी धाड टाकण्यात आली.

महाराष्ट्रात दळणवळण बंदीमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्यामुळे राज्यशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील दळणवळण बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

खरी लोकशाही आणण्यासाठी सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

संविधान दिनाच्या निमित्ताने हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. त्याद्वारे त्यांनी जनतेला संबोधित केले.