अवेळी पडलेल्या पावसामुळे पिकांची हानी
२४ मार्चला रात्री आणि २५ मार्चला सकाळी पुणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव अन् बुलढाणा या जिल्ह्यांत जोरदार वार्यासह पाऊस पडला. पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.
२४ मार्चला रात्री आणि २५ मार्चला सकाळी पुणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव अन् बुलढाणा या जिल्ह्यांत जोरदार वार्यासह पाऊस पडला. पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.
कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या मागणीनुसार ‘जीवनदान ग्रुप’च्या माध्यमातून २६ मार्च या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन नाचणे गोडाऊन स्टॉप येथे करण्यात आले आहे. यासाठी ५० रक्तदात्यांची सूची सिद्ध असल्याची माहिती ‘जीवनदान ग्रुप’कडून देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये नागरी कृती दलाची स्थापना केली आहे. रत्नागिरी शहरातील प्रभागाचे नगरसेवक या दलाचे अध्यक्ष असतील.
कोरोनामुळे देश बंद झाल्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनाही बसत आहे. द्राक्ष वाहतुकीला राज्यबंदी झाल्यामुळे द्राक्षे बागेतच पडून राहून खराब होत आहेत.
तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका ‘वेअर हाऊस’मधील आस्थापनात अवैध आणि अप्रमाणित ‘सॅनिटायझर’चा अनुमाने ८ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला असून अमित अलिम चंदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.
येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.
कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात २३ जण निरीक्षणाखाली आहेत.