मुंबई येथे वाहतूक पोलिसाला मारहाण, ४ तृतीयपंथियांना अटक

वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस हवालदार विनोद सोनवणे यांच्यावर ४ तृतीयपंथियांनी आक्रमण केल्याचा प्रकार १६ फेब्रुवारी या दिवशी येथील छेडानगर जंक्शन परिसरात घडला आहे.

ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्गाकरिता सिडको भूमी देेणार

या रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा भार न्यून होण्यास साहाय्य होणार आहे,

इतर प्रभागांत गेलेली नावे परत समाविष्ट न केल्यास आंदोलन करू ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

शिवसेनेचा महापौर होऊ नये, म्हणून त्यांच्या हक्काचे ६०० ते १ सहस्र मतदार दुसर्‍या मतदारसंघात टाकायचे आणि या ठिकाणी विरोधकांचे मतदार घुसवायचे, असे षड्यंत्र चालू आहे.

पेट्रोल आणि डिझेल वाढीवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे मौन का ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शासनाच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्वीटरच्या माध्यमातून डिझेल-पेट्रोल तेलांच्या वाढत्या किमतींवर बोलत होते; मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे.

राज्यातील २८ जिल्ह्यांना अवेळी पावसाची चेतावणी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांवर अवकाळीचे सावट !

राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट आणि पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जिल्हा अकोला), खामगाव (जिल्हा बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला.

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दायित्व वाढले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुणे जिल्ह्यात संचारबंदी नाही, तर जमावबंदीचे आदेश लागू ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक कारवाई चालू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

जत (जिल्हा सांगली) येथील गुड्डापूरच्या श्री दान्नमादेवी देवस्थानच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

स्थानिक न्यायालयाने ही तक्रार प्रविष्ट करून घेत जत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद करून चौकशी करावी, असा आदेश दिला आहे.

अवेळी पावसामुळे विदर्भातील वातावरण गारठले

तुरळक गारपिटीमुळे संपूर्ण पूर्व विदर्भातील वातावरण गारठले आहे.

राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो का ? याविषयी कायदेशीर माहिती घेत आहोत ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

विधान परिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीचे रखडलेले प्रकरण