नागपूर येथे २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ६४४ नवीन रुग्ण !

जिल्ह्यात २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर ६४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या धोकादायक काळातही नागरिकांनी नियम न पाळल्यास जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात येईल, अशी चेतावणी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली आहे.

सहकार विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांसह ६५ संचालकांना ‘क्लीन चीट’

वर्ष २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये राज्य सहकारी बँकेतील या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पांगारे (जिल्हा सातारा) ग्रामस्थ बससेवेपासून वंचित

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करू शकत नाहीत, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. बससेवा चालू करण्यासाठी प्रशासन आंदोलनाची वाट पहात आहे का ?

मनसे कार्यकर्त्यांनी इचलकरंजीत महावितरणचे कार्यालय फोडले

दळणवळण बंदी काळातील वीजदेयके पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. याची कोणतीच नोंद न घेता काही दिवसांपासून महावितरणने प्रलंबित वीजदेयक ग्राहकांची विद्युत् जोडणी तोडण्याची मोहीम चालू केली आहे.

उत्पादनांच्या वेष्टनावरील हनुमानाचे चित्र न हटवल्यास आंदोलन करणे भाग पडेल ! – न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या वतीने श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेला निवेदन

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या विविध उत्पादनांवर श्री हनुमानाचे चित्र मुद्रित करण्यात आले आहे. या उत्पादनांची वेष्टने यांचा वापर करून झाल्यावर ती रस्ता, कचरा, तसेच अन्यत्र टाकून दिली जातात..

शिवकालीन गड-किल्ले जगाच्या पटलावर आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

शिवकालीन गड-किल्ले विदेशात असते, तर विदेशींनी त्याचा संपूर्ण कित्ता जगभर पसरवला असता, हे लक्षात घ्या !

पती-पत्नीच्या घटस्फोटानंतरही कन्येच्या विवाहाचे दायित्व पित्याचे !

कौटुंबिक प्रकरणात नागपूर खंडपिठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

कन्हैयाकुमारच्या सभेस पोलिसांनी अनुमती नाकारली

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने २० फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता दसरा चौक येथे कन्हैयाकुमार याच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या सभेस अनुमती नाकारली आहे.

सांगली महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ! 

महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास महापौर सौ. गीता सुतार आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुष्पहार अर्पण केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक पुन्हा घेण्यात येणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचा परिणाम !