नवी मुंबई येथे १४ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत महोत्सव रन’चे आयोजन !

नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट या दिवशी ‘अमृत महोत्सव रन’(दौड) सीबीडी पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता दौड होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता लाच घेतांना अटक !

नवीन पाण्याच्या जोडणीसाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र बळवंत हुजरे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

मुंबईत ‘बेस्ट’ची मोनोच्या खांबाला धडक !

बेस्ट बसच्या चालकाला अपस्माराचा (फीट) झटका आल्याने त्याचे नियंत्रण सुटून बस मोनोच्या खांबाला धडकली. ही घटना सकाळी चेंबूर वसाहत परिसरात घडली. बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते; पण यात कुणीही घायाळ झाले नाही

ग्रामीण भागातील मुलींना बसचा पास विनामूल्य मिळण्यासाठी कन्या शाळेचा एस्.टी. प्रशासनाकडे पत्रव्यवहार !

ग्रामीण भागातील मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी रहावीत, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा शहरातील कन्या शाळेच्या वतीने या भागातील मुलींसाठी बसचा पास विनामूल्य मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

कोलगाव येथील शासकीय गोदामाची इमारत ३ वर्षे धूळ खात पडून

गेली अडीच वर्षे सत्तेत असूनही गोदामाच्या कार्यवाहीसाठी काही न करणारी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे १५ ऑगस्टपूर्वी कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार !

नाशिक येथील काळाराम मंदिरातील गाभार्‍याला गळती !

मंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे !

केंद्राने ध्वजसंहितेत केलेल्या पालटानुसार आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार !

पॉलिस्टरपासून सिद्ध केलेल्या, तसेच यंत्रावर सिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला कोणत्याही वेळी वंदन करता येईल.

पुणे शहरातील खड्डे तातडीने बुजवण्याच्या संदर्भात उपाययोजना करावी !

असे पत्र वाहतूक पोलिसांना पुणे महापालिकेला का द्यावे लागते ? महापालिका स्वतःहून खड्डे बुजवण्याचे काम हाती का घेत नाही ?

राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने !

ठाकरे सरकारने कामाकाजाच्या पहिल्याच दिवशी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती; पण आता नव्या सरकारने आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठवली आहे.

शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय झाला, असे पवारांना वाटत असेल, तर त्यांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा. शरद पवार हे इतिहासकार नाहीत.