श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्‍या यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ !

बाळीवेस येथील हिरेहब्‍बू वाड्यातून पूजाविधी पूर्ण करून ७ मानाचे नंदीध्‍वज ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्‍यासाठी मार्गस्‍थ झाले होते. या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्‍यासह अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

मानवी हक्‍कांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी  ३२ लाख रुपये हानीभरपाई द्या !

मानवी हक्‍काचे उल्लंघन झाल्‍याच्‍या ३५० तक्रारी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे आल्‍या होत्‍या. त्‍यांतील २०० तक्रारींवर चर्चा झाली. यामध्‍ये ३२ लाख रुपयांची हानीभरपाई देण्‍याचा आदेश राज्‍य सरकारला देण्‍यात आला आहे

घाटकोपर येथे १४ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त भव्‍य वाहनफेरी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घाटकोपर (मुंबई) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ १३ जानेवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी ५० हून अधिक वाहनचालकांनी वाहनफेरीत सहभाग घेतला.

काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते सुनील केदार यांना न्‍यायालयाकडून १ वर्ष कारावासाची शिक्षा !

अधिकार्‍यांना मारहाण करणारे पदाधिकारी असणारी काँग्रेस सत्तेत आल्‍यास गुंडशाहीचाच अनुभव देणार, हे जनतेने ओळखावे !

सिन्‍नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात १० जण ठार !

सिन्‍नर-शिर्डी महामार्गावर १३ जानेवारीच्‍या पहाटे ५ वाजता पाथरे येथे  मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस आणि शिर्डीकडून सिन्‍नर बाजूकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या भीषण अपघात १० प्रवासी ठार, तर २५-३० प्रवासी घायाळ झाले आहेत.

दौंड (पुणे) येथे प्रतिवर्षी २०० हून अधिक हिंदूंचे इस्‍लाममध्‍ये धर्मांतर !

दौंड भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्‍वरित या प्रकरणात हस्‍तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्‍यक !

खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह यांची याचिका न्‍यायालयाने तात्‍पुरती स्‍वीकारली

मालेगाव बाँबस्‍फोट प्रकरणातील संशयित त्‍याचप्रमाणे भाजपच्‍या खासदार साध्‍वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या (‘एन्.आय.ए.’च्‍या) न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्‍यक्ष सूरज ढोली यांचे निधन !

‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्‍यक्ष सूरज ढोली यांचे १२ जानेवारीला हृदयविकाराने निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्‍यांच्‍या मावळ्‍यांची परंपरा म्‍हणजेच शिवकालीन युद्धकला भारतातील मराठी बांधव, युवा पिढी यांना माहिती व्‍हावी, त्‍यांनी ती अवगत करावी, या उद्देशाने शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच कार्यरत होता.

श्री त्र्यंबकेश्‍वर ज्‍योतिर्लिंगाचे द्वार ८ दिवसांनंतर उघडले !

श्री त्र्यंबकेश्‍वर ज्‍योतिर्लिंगाचे संवर्धन करण्‍यासाठी आणि मंदिराच्‍या देखभालीच्‍या कामासाठी गेल्‍या ८ दिवसांपासून भाविकांच्‍या दर्शनासाठी बंद असलेले मंदिराचे प्रवेशद्वार १३ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता उघडण्‍यात आले.

‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून लोकांपर्यंत माहिती पोचवण्‍याचा प्रयत्न ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल जिहाद’च्‍या संकटाची माहिती हिंदूंना  होण्‍यासाठी, तसेच त्‍या संदर्भात जागृती करण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्‍या माध्‍यमातून कोणती उत्‍पादने हलाल प्रमाणित आहेत, ते समजण्‍यास आपल्‍याला साहाय्‍य होईल.