(म्हणे) राज्यातील असहिष्णुतेत वाढ : विरोध न करता कब्रस्तान बांधण्यास सहकार्य करावे !

राज्यात असहिष्णुतेत वाढ होत आहे. मृत्यूनंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करायला मिळणे, हा मुसलमानांसह प्रत्येक धर्मातील लोकांचा अधिकार आहे. यासाठी ख्रिस्ती समाजातील लोकांनी सोनसोडो येथे कब्रस्तान बांधण्यास विरोध न करता कब्रस्तान बांधकामाला सहकार्य करावे, असे आवाहन गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी यांच्या वतीने ख्रिस्ती धर्मगुरु ओलावो कायडो यांनी केले आहे.

आश्रमजीवनाची ओढ असणारा आणि प्रत्येक कृती साधनेच्या स्तरावर करणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. स्मित राजेश कांबळे (वय १३ वर्षे) !

आश्‍विन शुक्ल पक्ष द्वादशी (२.१०.२०१७) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. स्मित कांबळे याचा वाढदिवस आहे.

रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापिठाची आवश्यकता

संपूर्ण देशातून मुंबई विद्यापिठात विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने विद्यापिठाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन प्रशासकीय कारभार पुरता कोलमडला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र येथे अनेक विद्यापिठे आहेत.

देशात स्वच्छ दर्पण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम

देशातील पहिला स्वच्छ जिल्हा असा मान पटकावल्यानंतर आता जिल्ह्याने पुन्हा एकदा केंद्रशासनाच्या स्वच्छ दर्पण स्पर्धेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. २ ऑक्टोबरला नवी देहली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कोकण रेल्वेमार्गावर तीन विशेष गाड्यांचे नियोजन

कोकण रेल्वे मार्गावर दसरा आणि दिवाळी यांसाठी ३ विशेष गाड्या घोषित करण्यात आल्या आहेत. यातील पहिली गाडी (क्रमांक ००५०४/००५०३) जनसाधारण विशेष २ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता रत्नागिरी येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.

तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधातील बलात्काराचा आरोप निश्‍चित

तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी गोव्यातील म्हापसा येथील सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. या खटल्याची सुनावणी आता चालू होणार आहे. 

फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ ग्रंथाचे प्रकाशन

एस्.एस्.आर्.एफ्.चा (स्पीरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचा) फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा पहिला ग्रंथ एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले.

रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार्‍यांवर कारवाई करावी !

रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ डिचोली, वास्को आणि मडगाव अशा तीन ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी घातक प्रवृत्तीच्या रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ असे मोर्चे काढणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोह आहे.

बायणा, वास्को येथील अवैध बांधकामाच्या विरोधातील कारवाईत पालिकेने ४० वर्षे जुनी दोन मंदिरे पाडली

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून मुरगाव नगरपालिकेने २६ सप्टेंबर या दिवशी बायणा, वास्को येथील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करतांना तेथील श्री बसवेश्‍वर मंदिर आणि श्री लक्ष्मी मंदिर ही सुमारे ४० वर्षे जुनी मंदिरेही पाडली.


Multi Language |Offline reading | PDF