कदंब महामंडळाच्या ‘इलेक्ट्रिक बस’मुळे गोव्यात कार्बन उत्सर्जनात घट ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कदंब महामंडळाच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचे सरकारचे ध्येय असून यामुळे कार्बन उत्सर्जनात १०० टक्के घट होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात १० उद्योगांना गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मान्यता

३४८ कोटी रुपयांची गुंतवणूक : ३ सहस्र ५०० युवकांना नोकर्‍या मिळणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍याला कांदोळी (म्हापसा – गोवा) येथे जमावाने चोपले

‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे !

गोवा : मंत्रीपद देण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे पैशांची मागणी करणारा पोलिसांच्या कह्यात !

नागपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीरज सिंह राठोड याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे.

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी समितीने अहवालासाठी आणखी २ मास मागितले

जानेवारी २०२३ मध्ये समितीची स्थापना झाली आणि समितीला ३० दिवसांच्या आत सरकारला अहवाल सुपुर्द करायचा होता; मात्र समितीने आतापर्यंत केवळ प्राथमिक अहवालच सरकारला सुपुर्द केला आहे. समितीने आणखी अवधी मागितला आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार येथील सनातनच्‍या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना भावपूर्ण वातावरणात करण्‍यात आली.

ढवळी (गोवा) येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित बिंदुदाबन शिबिरात साधकांचा उत्स्फूर्त सहभाग !

सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गाेचपारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते.

गोवा ते उत्तराखंड थेट विमानसेवा चालू होणार

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) आणि उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळ (डेहराडून) या ठिकाणी नवीन थेट विमानोड्डाण ‘इंडिगो एअरलाइन्स’द्वारे चालवले जाईल. यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि त्रासमुक्त अनुभव मिळेल.

गोव्यात यंदा ८ जूनला पाऊस : वेधशाळेचा अंदाज

नैऋत्य पाऊस भारतीय उपखंडात ४ जून या दिवशी पोचणार आहे. पाऊस ४ जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे, तर ८ ते ९ जूनपर्यंत पाऊस गोव्यात पोचणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गोव्याचा इतिहास पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे, हे स्वीकारा ! 

गोव्याचा इतिहास हा पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे. गोमंतकियांनी हे सत्य स्वीकारले पाहिजे. गोव्यात मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि चर्च बांधण्यात आले. गोव्यात धर्मांतर करण्यात आले.