गोव्यात ‘होम स्टे’ योजनेला मोठ्या प्रमाणात वाव ! – पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

गोवा सरकारने ‘गोवा स्टे’ योजनेला चालना देणारे धोरण आखले पाहिजे आणि यामुळे अधिक खर्च करण्याची क्षमता असलेले पर्यटक गोव्यात आकर्षिले जाऊ शकतात.

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल समितीकडून शासनाकडे सुपुर्द

हा अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ५ सदस्यीय तज्ञ समितीची नियुक्ती काही मासांपूर्वी केली होती. सरकारने अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचे प्रावधानही केले आहे.

गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पर्यटन खात्यातील अधिकारी किंवा एखादी व्यक्ती शॅकधारकांकडून पैसे मागत असल्यास तक्रार का प्रविष्ट केली जात नाही ? एकीकडे पर्यटन खात्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे अवैध कृती चालूच ठेवायची, हे चालणार नाही.

गोवा : कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांची कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट

यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

हरमल टेकडीवर श्री परशुरामाचा पुतळा उभारा ! – संजय हरमलकर, प्रख्यात चित्रकार, गोवा

परशुराम टेकडीवर भगवान परशुराम यांच्या खुणा अद्याप जिवंत आहेत. इथे भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारावा. भगवान परशुराम यांची चित्रे रेखाटावीत. यामुळे पर्यटनाला वाव मिळण्यासमवेतच स्थानिकांना रोजगार मिळू शकेल.

वादळी वार्‍यासह पावसाने दक्षिण गोव्याला झोडपले

अनेक ठिकाणी झाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सुन पावसाचे केरळमध्ये ४ जून, तर गोव्यात ८ जून या दिवशी आगमन होण्याची शक्यता आहे.

गोवा : मुसलमानांनी गोव्यातून पळवून नेलेल्या २ अल्पवयीन मुलींची हुब्बळ्ळी येथून सुटका

तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर ४८ घंट्यांत गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही मुली हिंदु धर्मीय होत्या का ? याची माहिती मिळू शकलेली नाही.

गोवा : शासनाकडून पणजी परिसर, तसेच पणजी ते बाणस्तारी आणि पणजी ते झुआरी पूल या मार्गांवर वाहनांसाठी वेगमर्यादा अधिसूचित

उत्तर गोवाचे जिल्हा दंडाधिकारी यांनी वाहनांसाठी वेगमर्यादा त्वरित प्रभावाने अधिसूचित केली आहे. ती देत आहोत.

गोव्यात आजपासून स्मार्ट सिग्नल कार्यान्वित होणार

हा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा आहे. तो इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा २०० मीटर अंतरावरून आणि रात्री १०० मीटर अंतरावरूनही व्हिडिओ अन् छायाचित्र या माध्यमातून नोंद ठेवतो. ज्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले असेल, त्या वाहनाच्या मालकाला दंडाची नोटीस पाठवली जाणार !

गोवा : पद्मश्री विनायक खेडेकर आणि पंडित प्रभाकर कारेकर गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित

गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककलेसाठी आणि पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतासाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.