रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नृसिंह याग पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला.

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, उपसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्‍याचे षड्‍यंत्र रोखणे हे धर्मकर्तव्‍यच !

सनातनच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘इ-बुक’चे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते लोकार्पण !

या इ-बुकमध्‍ये ‘अध्‍यात्‍मशास्‍त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्‍य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर उपलब्‍ध आहे.

गोव्यात समान नागरी कायद्याला गेल्या ६० वर्षांत कुणाकडूनही विरोध नाही ! – मुख्यमंत्री 

काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष, ते स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांची मागणी करत नाहीत. जर विरोधी पक्षाला या दोन्ही गोष्टी देशात लागू करायच्या असतील, तर त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.

१५ जुलैपर्यंत ५ सहस्र युवक थेट सरकारी विभागांमध्ये शिकाऊ (अप्रेंटिस) म्हणून सहभागी होतील ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘प्रत्येक पंचसदस्य, सरपंच आणि नगरसेवक यांचे युवकांची ‘नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) पोर्टल’वर नोंदणी करून घेणे, हे ध्येय असले पाहिजे. या योजनेअंतर्गत वर्षभरात ‘शिका आणि कमवा’ ही योजना कार्यवाहीत आणली जाईल.’’

गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या

सदर कॅसिनोवर व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्‍यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे. 

गोव्यात किनारपट्टी भागातील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस

म्हापसा शहरात सर्वांत अधिक म्हणजे १४७ मि.मी. पाऊस पडला तर मुरगाव आणि दाबोली येथील केंद्रांत अनुक्रमे १४१.८ मि.मी. अन् १४१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील २ आठवड्यांत मोसमी वारे क्रियाशील रहाणार असून अधिक प्रमाणात पाऊस पडणार !

डॉ. प्रमोद सावंत भाजपच्या वतीने गोव्यातील सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री

सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री रहाण्याचा मान ! मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे सलग मुख्यमंत्री रहाण्याला २९ जून या दिवशी ४ वर्षे १०२ दिवस पूर्ण झाले आहेत.

भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्‍ये मतदान करू ! – अजितसिंह बग्‍गा, राष्‍ट्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, व्‍यापार मंडळ आणि अध्‍यक्ष, वाराणसी व्‍यापार मंडळ

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्‍या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्‍थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्‍यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही पुनर्स्‍थापित केल्‍याविना आम्‍ही रहाणार नाही.

गोव्यात मागील ६ मासांत ४ सहस्र ७०० हून अधिक वाहनधारकांची अनुज्ञप्ती तात्पुरती रहित

दंड वाढवूनही नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, याचाच अर्थ नागरिकांमध्ये नीतीमत्ता नाही. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक !