राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आश्वासन ! –  मुख्यमंत्री

गोव्यात ३७ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह गोव्यात विविध उपक्रम राबवणे, यांसाठी केंद्र सरकार गोवा सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे अस्तित्व पडताळण्यासाठी भूमीचे उत्खनन करा !

शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी पाडले. सध्या तेथे मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे आणि याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे संबोधले जाते.

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारताला उशिरा स्वातंत्र्य मिळाले ! – पू. भिडेगुरुजी

मोगल आणि ब्रिटीश यांच्याकडे चाकरी करणार्‍या लाचार हिंदूंमुळेच भारत देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हिंदूंची मानसिकता अशी आहे की, पैसे फेकले की, ते कशालाही सिद्ध होतात.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांचा गोवा दौरा आटोपून देहलीला मार्गस्थ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २४ ऑगस्ट या गोवा दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, वेर्णा येथील श्री महालसा मंदिर आणि जुने गोवे येथील बासिलिका बॉम जीसस चर्च यांना भेटी दिल्या.

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर बांधा ! – स्थानिकांची मागणी

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळचे प्रवेशद्वार) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली. या वेळी पूजण्यात आलेली मूर्ती ही देवीच्या भक्तांना चालू वर्षी मे मासात याच परिसरात नदीच्या काठी सापडली होती.

चोरी आणि खंडणी यांमध्ये सहभागी असलेला पोलीस हवालदार विकास कौशिक सेवेतून बडतर्फ

सराईत चोराने हवालदार विकास कौशिक यांचे कारनामे सांगेपर्यंत ते इतर पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?

गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात हवेतून हवेत मारा करणार्‍या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय वायू दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (एल्सीए) एल्एस्पी-७ तेजसने २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ (दृष्टीक्षेपाच्या पलीकडील अस्त्र) या हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले.

गोवा विधानसभेचे पावित्र्य अबाधित ठेवा !

राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !

गोव्यात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यावर ११ ठिकाणी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक !

पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.

(म्हणे) ‘पू. संभाजी भिडेगुरुजी यांना गोव्यात येण्यापासून रोखा !’ – गोवा काँग्रेस

एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करणार्‍या काँग्रेसला हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांना विरोध का ?