गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २५० कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा ! – शैलेंद्र वेलींगकर, शिवसेना

केवळ १३१ रुपये किमतीच्या प्रति इंजेक्शनची २ सहस्र रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे एकूण १०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३०१ उमेदवार रिंगणात

मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे ! – आरोग्य खाते

कोरोनाचे विविध प्रकार ओळखू शकणारे ‘जीनोम सिक्वेसिंग’ यंत्र गोव्यात १५ फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होणार आहे.

पक्षाचे मूळ सदस्य असलेले १४ उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात केलेले २३ उमेदवार निवडून येण्याचा गोवा भाजपला विश्वास

भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.

गोव्यात आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ मिळून एकूण १० कोटी १३ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात !

निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !

गोव्यात ११ लक्ष ६४ सहस्र मतदार १ सहस्र ७२२ मतदान केंद्रांतून मतदानाचा हक्क बजावणार !

१४ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ११ लक्ष ६४ सहस्र २२४ मतदार १ सहस्र ७२२ मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान करणार आहेत.

भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांचा आरोप

काँग्रेसचे सुनील कवठणकर म्हणाले, ‘‘लोकशाहीची तत्त्वे धोक्यात आली आहेत. भाजपचे नेते १० किंवा त्याहून अधिक समर्थकांसह त्यांचा प्रचार करत आहेत; परंतु त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.

निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन

निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन ! कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला.

गोवा शासनाने कोरोनाविषयक निर्बंधांचा कालावधी १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला

शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण देणार्‍या संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद रहाणार आहेत; मात्र शिक्षक ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासाठी शाळांमध्ये उपस्थित रहाणार !

काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर न करण्याची पणजी येथील श्री महालक्ष्मीदेवीसमोर घेतली शपथ

स्वार्थासाठी पक्षांतर करणारे पक्षद्रोही म्हणजेच राष्ट्रद्रोही असतात, हे खरे; पण ‘गोव्यात सुराज्य आणू’, अशी शपथ घेतली असती, तर ते जनतेला अधिक आवडले असते !