पाठ्यपुस्तकांत भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करण्याचा ठराव हिंदु राष्ट्र संसदेत एकमताने संमत !

भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

VIDEO : आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षण आवश्यक ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंची शिक्षण प्रणाली’ या विषयावर विचारमंथन

VIDEO : आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करायला हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी हे कार्य करायला हवे. असेे करणे म्हणजे समाजऋण फेडण्यासारखेच आहे आणि यातून आपली साधनाही होणार आहे.

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मकार्यामध्ये योगदान देणारे युवक निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रवीर’ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे.

VIDEO : मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे रणनीती निश्‍चित करून हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायला हवे.

VIDEO : इस्लामी जिहादच्या विरोधात निरंतर संघर्ष करायला हवा ! – प.पू. यती चेतनानंद सरस्वती, महंत, डासना पीठ, गाझियाबाद, उत्तर प्रदेश

इस्लामी जिहादला घाबरून रडण्याऐवजी त्या विरोधात लढले पाहिजे. देहली येथे धर्मांधांनी घडवलेली दंगल, काश्मीरमध्ये हिंदूंच्या होणार्‍या हत्या, अशा अनेक घटना भारतात घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांच्या विरोधात निरंतर संघर्ष चालूच राहील.

VIDEO : सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! – पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक

जेव्हा धर्मावर अधर्म वरचढ झाला, तेव्हा भगवान परशुरामाने परशू धारण केला. अशा परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही तपस्या करण्याची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे.

धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मी जाती-धर्मांत भेदभाव करत नाही. कुणीही लोकांचे आमिषे दाखवून धर्मांतर करू शकणार नाही. यापुढे अशा कृत्यांना राज्यात अजिबात थारा दिला जाणार नाही, तरीही कुणी ऐकत नसेल, तर राज्यात धर्मांतरबंदी कायदा आणावा लागणार आहे.

VIDEO : ‘दुर्गांचे रूपांतर दर्ग्यात होऊ नये’, यासाठी हिंदूंनी संघटित कार्य करणे आवश्यक ! – मनोज खाडये, समन्वयक, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकात केवळ ६ मुलींच्या हिजाबवरून राष्ट्रीय आंदोलन उभे राहिले; मात्र कमलेश तिवारी, हर्षा यांसह कित्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याविरोधात भारतातील हिंदू शांत राहिले.