हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली ओलिसांसाठीही दिवाळीमध्ये एक दीप पेटवा ! – नागोर गिलॉन, भारतातील इस्रायलचे राजदूत

भारतातील हिंदू इस्रायली ओलिसांसाठी असे करतीलही, यासह हिंदूंनी गेल्या ७ दशकांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश येथील, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या रक्षणासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !

 Human Trafficking NIA raids : मानव तस्करीच्या प्रकरणी ‘एन्.आय.ए.’च्या ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मानव तस्करीमध्ये सहभागी लोकांना पकडण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथे धाडी घातल्या. या वेळी जम्मूतील बठिंडी येथून म्यानमारच्या एका रोहिंग्या मुसलमानाला कह्यात घेण्यात आले.

आता सहन करण्याच्या पलीकडे गेले असून आम्ही बुलडोजर चालवण्यास प्रारंभ केला, तर थांबणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांवर अशा फटकारण्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि जनतेला जीवघेण्या प्रदूषणाला प्रतिवर्षी सामोरे जावे लागणार. त्यामुळे न्यायालयाने स्वतः यावर जातीने लक्ष देऊन प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

54th IFFI 2023 : मायकेल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !

चित्रपट सृष्टीतील एक चमकता तारा आणि चित्रपट विश्‍वातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे हॉलिवूड कलाकार मायकल डग्लस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

देहलीमध्‍ये बसले भूकंपाचे धक्‍के !

देहली आणि एन्.सी.आर्. भागात ६ नोव्‍हेंबरला दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्‍के बसले. याची तीव्रता रिक्‍टर स्‍केलवर ५.६ इतकी मोजण्‍यात आली. याचा केंद्रबिंदू नेपाळमध्‍ये होता

Supreme Court told Governor : देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करावे ! – सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

पंजाब सरकारने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

देहलीमध्ये बसले भूकंपाचे धक्के !

भूकंपाचे धक्के नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

तमिळनाडूमध्ये रा.स्व. संघाच्या पथ संचलनास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

संघाला मुसलमानविरोधी म्हणणारा द्रमुक स्वतः मात्र हिंदुविरोधी आहे, हे दाखवून देत आहे !

PFI Supreme Court : आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’वरील ५ वर्षांच्या बंदीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘पी.एफ्.आय.’सह अन्यही ८ संघटनांचा देशाला धोका असल्याचे सांगत केंद्रशासनाने बंदी घातली होती.

एअर इंडियाने ३० नोव्हेंबरपर्यंत तेल अविवकडे जाणारी प्रवासी वाहतूक केली स्थगित !

साधारणपणे, देहलीतून तेल अविवला जाण्यासाठी आठवड्यातून ५ वेळा उड्डाणे असतात. परंतु आता वाढत्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ही उड्डाणे रहित करण्यात आली आहेत.