उत्तर भारतात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा बंधने  !

देशात कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण दळणवळण बंदी नसली, तरी अनेक बंधने घोषित करण्यात आली आहेत.

(म्हणे) ‘मुसलमानांना राजकारणामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असू नये, या खोटेपणावर हिंदुत्व आधारित ! – असदुद्दीन ओवैसी

‘हिंदुत्वा’ची स्वतःला हवी तशी व्याख्या करण्यात किंवा अर्थ काढून त्यावर टीका करण्यात हुशार असणारे ओवैसी !

(म्हणे) ‘हिंदु कायद्यान्वये समलैंगिक विवाहाला मान्यता द्या !’

हिंदु विवाह कायदा हा भारतीय राज्यघटनेने बनवला असला, तरी हिंदु धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारच्या विवाहाला संमती नाही. त्यामुळे याचा न्यायालयाने विरोधच केला पाहिजे, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

पाकिस्तानला मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी मिळतच रहाणार ! – केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के. सिंह

पाकिस्तान वर्ष १९९० पासून भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद्यांना एकत्र करत आहे. हे काम तो चालूच ठेवणार आहे. थोड्याशा पैशांसाठी सिद्ध होणारे मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी पाकला मिळतच रहाणार.

काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी २६/११ सारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते !

आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा असेच आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, त्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवायला हवे !

केंद्र सरकारकडून सुदर्शन टीव्हीच्या यु.पी.एस्.सी. जिहाद कार्यक्रमाला अनुमती

केंद्रातील भाजप सरकारने सुदर्शन टीव्ही या खासगी वृत्तवाहिनीवरील बिंदास बोल या साप्ताहिक कार्यक्रमातून यु.पी.एस्.सी. जिहाद या विषयाच्या कार्यक्रमाला काही पालट करून प्रसारित करण्याची अनुमती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

सीबीआय चौकशीसाठी राज्यांची अनुमती घेणे आवश्यक !  – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) चौकशीसाठी संबंधित राज्याकडून अनुमती घेणे बंधनकारक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे.

लडाख चीनचा भूभाग असल्याचा नकाशा दाखवणार्‍या ट्विटरची क्षमायाचना

ट्विटरने त्याच्या मानचित्रामध्ये लडाखला चीनचा भूभाग दाखवला होता. या प्रकरणी भारताच्या संसदीय समितीने नोटीस बजावून क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने समितीसमोर लेखी क्षमायाचना केली आहे.

देहलीमध्ये मास्क न वापरणार्‍यांना आता २ सहस्र रुपयांचा दंड होणार

देहलीमध्ये गेल्या २४ घंट्यांमध्ये ७ सहस्र ४८६ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर आता देहली सरकारने देहलीत मास्क न घालणार्‍यांना २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा केली. यापूर्वी ५०० रुपयांचा दंड होता.