देहलीतील ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ३०० पोलीस घायाळ !

पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्‍या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?

काठ्या आणि झेंडे घेऊन या ! – व्हिडिओद्वारे शेतकर्‍यांना चिथावणी

देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत टिकैत यांच्यासहित सर्व शेतकरी नेत्यांना कारारगृहात टाकणे अपेक्षित होते ! तसे न होणे, ही देहली पोलिसांची निष्क्रीयताच म्हणावी लागेल !

देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !

दीप सिद्धू याच्याशी माझे संबंध नाहीत ! – भाजपचे खासदार सनी देओल यांचे स्पष्टीकरण

मी अगोदरही ६ डिसेंबर या दिवशी ट्वीट करून हे स्पष्ट केले आहे की, माझा किंवा माझ्या कुटुंबियांचा दीप सिद्धू याच्याशी कोणताही संबंध नाही, असे ट्वीट भाजपचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी केले आहे.

लैंगिक अत्याचाराविषयीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय स्थगित करते किंवा पालटते, यावरून जनतेने काय समजायचे ? असा प्रश्‍न निर्माण होतो !

३० जानेवारी या दिवशी देहलीत भाजपकडून तिरंगा मोर्चा

येथे प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांनी केलेल्या हिंसाचारानंतर आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ३० जानेवारी या दिवशी देहलीमध्ये तिरंगा फडकावणारा मोर्चा आयोजित केला आहे.

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेकडून आंदोलन मागे

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे शेतकरी नेते व्ही.एम्. सिंह यांनी शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याचे घोषित केले. ‘आमची संघटना देहलीतील हिंसाचारात सहभागी नव्हती’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देहलीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार ! : दोघांचा मृत्यू  

अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्‍यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !

८ वर्षे जुनी गाडी असलेल्यांना आता ‘हरित कर’ भरावा लागणार !

८ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच हरित कर (‘ग्रीन टॅक्स’) आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी ‘५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात येणार आहेत’, असे वृत्त प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले होते; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम रहातील.