५० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून ‘गेल’ चे संचालक ई.एस्. रंगनाथन यांना अटक

स्वातंत्र्यानंतर शाळेमधून धर्मशिक्षण देण्यात न आल्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात नीतीमत्ता कमालीची घसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे. हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !

प्रजासत्ताकदिनी आतंकवादी आक्रमणाची शक्यता

देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करावा लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

चॉकलेटच्या वेष्टनावर भगवान जगन्नाथाचे चित्र छापल्याप्रकरणी ‘नेस्ले’कडून क्षमायाचना

नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्‍या जागृत हिंदूंचे अभिनंदन !

सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे निधन

भारतीय नृत्य कलेला जगभरात एक अनोखी ओळख मिळवून देणारे, आयुष्यभर केलेची साधना करणारे कथ्थक नृत्यकलेचे तपस्वी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आणि शीख यांच्यापैकी एकाची निवड करा !’

खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा निःपात न केल्यामुळेच त्यांचे दुःसाहस वाढत चालले आहे, हे यातून दिसून येते. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

बहुसंख्य हिंदूंच्या केवळ २ सणांना, तर अल्पसंख्य मुसलमानांच्या ४ सणांना सरकारी सुट्टया घोषित !

ख्रिस्ती सणांना २, तर शीख, जैन आणि बौद्ध यांच्या सणांना प्रत्येकी एक सुट्टी !
सरकारी स्तरावर हिंदूंना दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना !

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्याचे पाकचे कारस्थान !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातील निवडणुका आतंकवादाच्या सावटाखाली पार पडतात, हे भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

मुक्त पत्रकार राजीव शर्मा याने चिनी गुप्तहेरांना भारताची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड !

देशाच्या सुरक्षेशी खेळणार्‍या अशा पत्रकारांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

हिंदूंनी म्हटले तर ‘हेट स्पीच’ आणि अहिंदूंनी म्हटले, तर ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’, हे कधीपर्यंत चालणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.

देहलीत कोरोनाला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोक लस न घेतलेले ! 

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.