‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘द कन्वर्झन’ या हिंदी चित्रपटाचे अमेरिकेत ‘स्क्रीनिंग’ !

विनोद तिवारी यांचे दिग्दर्शन आणि राज पटेल यांची निर्मिती असलेला हा चित्रपट केवळ ‘लव्ह जिहाद’पुरताच मर्यादित नसून निकाह, तिहेरी तलाक आणि हलाला या इस्लाममधील जाचक प्रथांवरही प्रकाश टाकणारा आहे.

सीबीआयने गमावलेली विश्‍वासार्हता परत मिळवण्यासाठी राजकारण्यांशी  संबंध तोडवेत !

भारताचे सरन्यायाधीशच थेट अशा प्रकारचे विधान करतात, याचा अर्थ केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांची बटीक बनून त्यांच्या आदेशानुसार कार्य करत आल्या आहेत.

नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ आणि भारत-नेपाळ रेल्वे सेवेचे उद्घाटन

३ दिवसांच्या भारताच्या दौर्‍यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी २ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ (डेबिट आणि क्रेडिट कार्ड), तसेच भारत अन् नेपाळ यांच्यामधील रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोनाचा ‘एक्सई’ हा नवा प्रकार ‘बीए-२’ पेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य ! – जागतिक आरोग्य संघटना

‘एक्सई’ हा कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या ‘बीए-२’ या उपप्रकारापेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य आहे;  परंतु याची निश्‍चिती करण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यास करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० !

राज्यसभेत प्रथमच भाजपची सदस्य संख्या १०० झाली आहे. हा विक्रम करणारा भाजप वर्ष १९९० नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ अल्प, म्हणजे केवळ २९ झाले आहे.

(म्हणे) ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनुमती देण्याची आवश्यकता नव्हती !’ – शरद पवार

काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय गेले ३२ वर्षे शरद पवार यांच्यासारख्या कथित निधर्मीवाद्यांमुळे दडपण्यात आला. तो आता उघड होत असल्याने त्याचा परिणाम शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या राजकीय पक्षांना निवडणुकीत भोगावा लागणार आहे.

तमिळनाडू सरकारने वानियार समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ १० वर्षांसाठी आरक्षण ठेवण्याची सूचना केली होती; मात्र त्याचे पालन न करता आरक्षण अजूनही का चालू आहे, याचे उत्तर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी देणे आवश्यक !

‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांकडून अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी बोलतांना ‘काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झालाच नाही’, असा दावा केला होता. यावरून ही निदर्शने करण्यात आली.

भारत बनणार ‘ग्रीन हायड्रोजन’ निर्यात करणारा देश ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ३० मार्च या दिवशी ‘ग्रीन हायड्रोजन’वर चालणार्‍या चारचाकी गाडीतून संसदेत पोचले. या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे. ‘मिराई’ याचा अर्थ म्हणजे भविष्य.