चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील युद्ध यंत्रणा केली अद्ययावत !

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या चीनला त्याच्या समजेल अशा भाषेत भारताने धडा शिकवणे आवश्यक !

कुवेतमध्ये नोकरीचे आमीष दाखवून विकण्यात आलेल्या केरळमधील ४ महिलांची सुटका

आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांचा तेथे छळ केला जातो, हे अनेक वर्षे चालू आहे. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

‘पूजा स्थळ कायद्या’तील काही कलमांच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘पूजा स्थळ कायदा १९९१’च्या (‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, १९९१’च्या ) काही कलमांच्या वैधतेला भाजपचे माजी खासदार चिंतामणी मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले.

अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी आणि तस्करांसाठी भारत बनत आहे अनुकूल ठिकाण ! – अमेरिकेतील संशोधन संस्था

अमली पदार्थांचे तस्कर भारताला अमली पदार्थ निर्मितीचे माहेरघर बनवू पहात आहेत. हे गंभीर असून केंद्र सरकारने या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक !

अंतिमत: विजय उद्धव ठाकरे यांचाच होईल ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मला विश्वास आहे की, त्यांचे आसामला गेलेले काही आमदार जेव्हा परत येतील, तेव्हा त्यांच्यासमवेत बैठक होईल आणि त्यात उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात, हे स्पष्ट होईल असा विश्वास पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ११ सहस्र ५७८ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसांत ७० सहस्र २६५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

गौतम अदानी यांच्या कुटुंबाकडून समाजकार्यासाठी ६० सहस्र कोटी रुपयांची देणगी !

अदानी म्हणाले की, हे दान भारतीय आस्थापनांच्या दान देण्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे दान आहे. ‘विप्रो’ आस्थापनाचे प्रमुख आणि प्रसिद्ध दानशूर अझीम प्रेमजी यांनी अडाणी यांच्या देणगीला ‘महान’ असे संबोधले आहे.

वर्ष २००२ मधील गुजरात दंगल हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील षड्यंत्र ! – गृहमंत्री अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे.