४ वर्षांत एअर इंडियाचे ३० वैमानिक उड्डाणपूर्व मद्यपान चाचणीत दोषी

एअर इंडियाच्या वैमानिकांवर ते मद्यपान करून विमान चालवत असल्याचे आरोप होत होते. या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१४ पासून हाती घेतलेल्या उड्डाणपूर्व दारूच्या चाचणीत एअर इंडियाचे ३० वैमानिक दोषी आढळले,

केंद्रीयमंत्री आणि अधिकारी यांच्यासाठी लवकरच १ सहस्र इलेक्ट्रिक चारचाकी वाहन येणार

केंद्र सरकारचे मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाचा वापर करण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे वाहन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

श्री श्री रविशंकर यांचे श्री श्री आयुर्वेद ट्रस्ट देशभरात १ सहस्र विक्री केंद्रे उघडणार

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे श्री श्री आयुर्वेद ट्रस्ट हे आयुर्वेदिक टूथपेस्ट आणि साबण विक्रीसाठी तब्बल १ सहस्र विक्री केंद्रे (रिटेल स्टोअर्स) उघडणार आहेत.

व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

राज्यघटनेतील कलम २१ नुसार व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २३ ऑगस्टला दिला. सरन्यायाधीश जे.एस्. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील ९ न्यायाधिशांच्या घटनापिठाने एकमताने हा निर्णय दिला.

लागोपाठ २ अपघातांनंतर रेल्वे महामंडळाच्या अध्यक्षांचे त्यागपत्र

आठवडाभरात लागोपाठ २ रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी त्यागपत्र दिले आहे. मित्तल यांना केंद्र सरकारने २ वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. वर्ष २०१६ मध्येच मित्तल निवृत्त होणार होते.

२०० रुपयांची नोट लवकरच चलनात येणार

५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली आहे. त्यानंतर आता लवकरच २०० रुपयांची नोट चलनात येणार आहे.

राष्ट्रपती भवनातील उद्यानाला दिलेले मोगल गार्डनचे नाव पालटून डॉ. राजेंद्र प्रसाद उद्यान असे नामकरण करा !

अखिल भारतीय हिंदू महासभेने राष्ट्रपती भवनातील उद्यानाला दिलेले मोगल गार्डनचे नाव पालटून त्याचे डॉ. राजेंद्र प्रसाद उद्यान असे नामकरण करावे.

तोंडी तलाकवर ६ मासांत संसदेने कायदा करावा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

तीन वेळा तलाक म्हणत देण्यात येणार्‍या तोंडी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने ६ मासांसाठी बंदी घालणारा निर्णय २२ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला. या ६ मासांमध्ये संसदेत कायदा करण्यात यावा, असा आदेश केंद्र सरकारला दिला आहे.

संतकृपा प्रतिष्ठानकडून दक्षिण देहली येथे वृक्षारोपण

संतकृपा प्रतिष्ठानकडून दक्षिण देहलीच्या कालकाजी येथील छडपूजा पार्क आणि राजीव गांधी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.

भारतात धूम्रपान करणार्‍या महिलांच्या प्रमाणात वाढ

भारतात महिलांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धूम्रपान करणार्‍या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुसर्‍या स्थानावर आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now