विशेष समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणार !

मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी-सर्वोच्च न्यायालय.

त्रिपुरा आणि नागालँड येथे भाजपने सत्ता राखली !

मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

नवी देहली जागतिक पुस्तक मेळाव्या’त ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक संधीचा लाभ उठवणारे कावेबाज ख्रिस्ती !

श्रीमंत देशांमुळे होणार्‍या जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसतो ! – पंतप्रधान मोदी

जगातील महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था मोठ्या आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अनेक वर्षांच्या प्रगतीनंतर आज आपण शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये मागे जाण्याचा धोका पत्करला आहे.

‘इस्लामिक स्टेट’च्या ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) लक्ष्मणपुरी येथील  विशेष न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये रेल्वेगाडीतील बाँबस्फोटांच्या प्रकरणी इस्लामिक स्टेटशी संबंधित ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा आणि त्यांच्या महंमद आतिफ उपाख्य ‘आतिफ इराकी’ या साथीदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सर्वाेच्च न्यायालयाकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना देश-विदेशांत ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा आदेश

केवळ मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याचे दायित्व अल्प खर्चिक असले, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

भारतात कार्य करणार्‍यांना कायद्यांचे पालन करावे लागेल ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

ज्यांना जी भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे, हेच आता भारत करू लागला आहे, हे चांगले लक्षण आहे !

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून राज्यांसाठी सूचना प्रसारित !

केंद्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सूचना प्रसारित केल्या आहेत. देशात प्रथमच आरोग्य मंत्रालयाकडून अशा प्रकारच्या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.

‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ची विदेशातून दान घेण्याविषयीची अनुज्ञप्ती निलंबित !

नियमांचे पालन न केल्यावरून येथील ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे ‘फॉरेन काँट्रीब्यूशन रेगुलेशन ॲक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) अनुज्ञप्ती केंद्रशासनाकडून निलंबित करण्यात आली आहे. यामुळे आता या संस्थेला विदेशातून दान स्वीकारता येणार नाही.

घरगुती गॅस सिलिंडरच्या मूल्यात ५० रुपयांची वाढ !

घरगुती सिलिंडरच्या मूल्यामध्ये ५० रुपयांनी वाढ तर व्यावसायिक सिलिंडरच्या मूल्यामध्ये ३५० रुपये ५० पैशांनी वाढ !