‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ची विदेशातून दान घेण्याविषयीची अनुज्ञप्ती निलंबित !

नियमांचे पालन न केल्यावरून येथील ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे ‘फॉरेन काँट्रीब्यूशन रेगुलेशन ॲक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) अनुज्ञप्ती केंद्रशासनाकडून निलंबित करण्यात आली आहे. यामुळे आता या संस्थेला विदेशातून दान स्वीकारता येणार नाही.

घरगुती गॅस सिलिंडरच्या मूल्यात ५० रुपयांची वाढ !

घरगुती सिलिंडरच्या मूल्यामध्ये ५० रुपयांनी वाढ तर व्यावसायिक सिलिंडरच्या मूल्यामध्ये ३५० रुपये ५० पैशांनी वाढ !

कोरोना नैसर्गिक नव्हता, तर जैविक युद्ध होते ! – श्री श्री रविशंकर

संपूर्ण जगाला कोरोनाशी लढा द्यावा लागला. लोकांना २ वर्षे घरातच रहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्या वेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोक यांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे. माझ्या शिष्यांनी मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता; कारण त्यामुळे वाद निर्माण झाला असता.

देहली येथे आयोजित ‘विश्‍व पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचे ग्रंथ प्रदर्शन

येथील प्रगती मैदानात २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत ‘विश्‍व पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍यात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावण्‍यात आले आहे. या प्रदर्शन कक्षाचे उद़्‍घाटन सनातन संस्‍थेचे संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांनी केले.

मी ख्रिस्ती असलो, तरी माझे हिंदु धर्मावर प्रेम आहे ! – सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ

हिंदु धर्म महान असला, तर हिंदूंना त्याचे ज्ञान नाही. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नसल्याने त्यांना याची माहिती नाही आणि त्यामुळेच हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडतात, गरीब हिंदू ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करतात !

तुम्‍हाला देश कायम अशांत ठेवायचा आहे का ?

परकीय आक्रमकांची दिलेली नावे पालटण्‍यासाठी ‘रिनेमिंग कमिशन’ची (नावात पालट करणार्‍या आयोगाची) स्‍थापना करण्‍याची मागणी फेटाळली ! सर्वोच्‍च न्‍यायालयाचा अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनी उपाध्‍याय यांना प्रश्‍न !

देहली उच्च न्यायालयाने ‘अग्नीपथ’ योजनेच्या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या !

देहली उच्च न्यायालयाने केंद्रशासनाच्या ‘अग्नीपथ’ या सैन्यातील भरती संदर्भातील योजनेला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. ‘ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला अधिकाधिक सक्षम करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे आहे’, असे मत न्यायालायने याचिका फेटाळतांना म्हटले आहे.

२ वर्षांनी देहलीत विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन !

हा पुस्तक मेळा जगातील सर्वांत मोठा पुस्तक मेळा आहे. यामध्ये देशातील कानाकोपर्‍यांतून लेखक, वाचक आणि विद्वान उपस्थित रहात असतात.

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआयकडून चौकशी

सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण अन्वेषणात मी पूर्ण सहकार्य करेन. मला काही मास कारागृहात रहावे लागले, तरी मला त्याची काळजी नाही.

आतंकवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाकमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघांना अटक

अटक झालेल्यांमध्ये ठाणे येथे रहाणारा २१ वर्षीय खालिद मुबारक खान आणि तमिळनाडू येथे रहाणारा २६ वर्षीय अब्दुल्ला उपाख्य अब्दुर रहमान यांचा समावेश आहे.