रामजन्मभूमीविषयी दिलेल्या निकालाच्या विरोधात मुसलमानांनी पुनर्विचार याचिका प्रविष्ट करू नये ! – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीविषयी निकाल दिला आहे. त्या विरोधात मुसलमानांनी पुनर्विचार याचिका प्रविष्ट करू नये; कारण जर याचिका प्रविष्ट केली, तर मुसलमान राममंदिराच्या उभारणीमध्ये अडथळा आणत आहेत, असा संदेश देशासह संपूर्ण जगभरात जाईल.

देहली पोलिसांनी गोलपोरा (आसाम) येथून ३ संशयित आतंकवाद्यांना केली अटक

देहली पोलिसांच्या विशेष पथकाने गोलपोरा (आसाम) येथून ३ संशयित आतंकवाद्यांना अटक केली आहे. मुकद्दीर इस्लाम, रंजीत अली आणि जमाल अशी त्या तिघांची नावे आहेत.

रामजन्मभूमीच्या निकालावर पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार नाही ! – सुन्नी वक्फ बोर्डाचा पुनरूच्चार

रामजन्मभूमीच्या खटल्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर या खटल्यातील एक पक्षकार सुन्नी वक्फ बोर्ड यांची २६ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालय आज सकाळी निर्णय देणार

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर २५ नोव्हेंबरला सुनावणी झाली.

शरद पवार वर्ष २०२२ मध्ये राष्ट्रपती बनू शकतात ! – रा.स्व. संघाचे विचारवंत दिलीप देवधर

भाजपचे सरकार स्थापन होण्याला शरद पवार यांची मूकसंमती आहे; कारण भाजप वर्ष २०२२ मध्ये पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवून त्याची परतफेड करू शकतो, खासदार सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते – रा.स्व. संघाचे विचारवंत दिलीप देवधर

रामजन्मभूमी निर्णयावर जनतेने शांती आणि एकता यांचे दर्शन घडवले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी खटल्याचा निकाल दिला. या निर्णयावर जनतेने शांती आणि एकतेचे दर्शन घडवले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते २४ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या ५९ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलत होते.

रेल्वे प्रवासाच्या कालावधीत घरात चोरी झाल्यास मिळणार भरपाई ! – आयआर्सीटीसीचा उपक्रम

रेल्वे प्रवासाच्या कालावधीत घरी चोरी झाल्यास भारतीय रेल्वेची उपसंस्था आयआर्सीटीसी १ लाख रुपयांपर्यंतचा विमा देणार आहे. यासाठी प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे लोकसभेत पडसाद : लोकसभा दुपारपर्यंत स्थगित

महाराष्ट्रात चालू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद २५ नोव्हेंबरला लोकसभेतही उमटले. लोकसभेचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात ‘लोकशाहीची हत्या करणे बंद करा’, अशी घोषणाबाजी केली.

राष्ट्रपती राजवट नको; म्हणून मी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला ! – राज्यपालांना दिलेल्या पत्रातील अजित पवार यांचे म्हणणे उघड

राज्यात राष्ट्रपती राजवट नको; म्हणून मी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आहे. माझ्यासमवेत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत आणि आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार !

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.