धार्मिक सौहार्द राखण्यासाठी भाजपचे मुसलमान नेते प्रयत्न करणार ! – रा.स्व. संघ आणि भाजप

रामजन्मभूमीविषयीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांशी धार्मिक सौहार्द राखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे पदाधिकारी महत्त्वाची भूमिका निभावतील, असे रा.स्व. संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पार पडलेल्या बैठकीत ठरवण्यात आले.

(म्हणे) ‘बँकॉकसह सर्वंकष आर्थिक सहयोग करार केल्यास देशांतर्गत शेतीमालाचे भाव कोसळतील !’

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहयोग करारावर (आर्सीईपी) स्वाक्षरी करण्यासाठी बँकॉकला गेले आहेत. या करारामुळे विकसित परराष्ट्रांतील अतिरिक्त शेतीमाल भारतात ओतला जाईल. त्यामुळे देशांतर्गत शेतीमालाचे भाव कोसळतील.

पाककडून सीमेवरील जंगलात आग लावून आतंकवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न !

पाण्यात राहून भारताविरुद्ध युद्ध कसे करायचे, याचेही दिले जात आहे प्रशिक्षण ! युद्धसज्ज पाकला कायमचा धडा शिकवण्यासाठी आता भारतानेही तितक्याच क्षमतेने आक्रमणाचा पर्याय निवडणे आणि यासाठी पाकिस्तानची मानसिकता जाणून तो रचत असलेल्या षड्यंत्रांना निष्फळ करण्यासाठी व्यूहरचना आखणे आवश्यक आहे !

केंद्र सरकारकडून भारताचा नवा नकाशा प्रकाशित

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख यांना वेगळे दाखवण्यात आले आहे.

भारत पुन्हा एकदा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार ! – इस्रो प्रमुख के. सिवन

चंद्राच्या पृष्ठ भागावर हळूवार पद्धतीने उतरण्याच्या प्रयत्नांमध्ये (सॉफ्ट लँडिंगमध्ये) पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नसले, तरी भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

वायूप्रदूषणामुळे देहलीतील हवाई वाहतुकीवर परिणाम !

भीषण वायूप्रदूषणामुळे समोरील दृश्य दिसणेही (visibility) कठीण झाल्यामुळे देहली विमानतळावर येणारी विमाने जयपूर, अमृतसर, लक्ष्मणपुरी (लखनौ) आदी शहरांतील विमानतळावर उतरवण्यात आली

निर्भया निधीतून सर्व पोलीस ठाण्यांत ‘महिला साहाय्य केंद्र’ आणि जिल्हास्तरावर ‘मानवी तस्करी विरोधी विभाग’ उभारणार !

महिलांच्या सुरक्षेसाठी योजना कार्यान्वित करण्यासह महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केल्यास त्या सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम होतील !

समलैंगिकता आणि व्यभिचार यांना दंडनीय अपराधाच्या कक्षेत आणा ! – सैन्याची मागणी

समलैंगिकता आणि व्यभिचार या पाश्‍चात्त्य विकृती आहेत. भारतीय हिंदु संस्कृतीनुसार या दोन्ही विकृती अनैतिक आणि दंडनीय आहेत. सरकारने सामाजिक दुष्परिणाम जाणून हिंदु परंपरांचे रक्षण करण्यासाठी विशेष कायदा करावा, हीच संस्कृतीप्रेमींची अपेक्षा !

देहलीतील तीस हजारी न्यायालय परिसरात पोलीस आणि अधिवक्ते यांच्यात हिंसाचार

न्यायालयाच्या परिसरातच असा हिंसाचार घडणे, हे कायदा-सुव्यवस्थेला लज्जास्पद ! कायद्याचे रक्षक आणि कायद्याचे तज्ञ यांनी जर एकमेकांच्या विरोधात हिंसाचार केल्यास त्यापुढे सर्वसामान्यांची काय दशा ? कायद्याच्या तज्ञांनी कायदा असा हातात घेणे कितपत योग्य ?

सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या ८ दिवसांत येणार ६ महत्त्वपूर्ण निकाल !

सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर या दिवशी निवृत्त होत असून त्याआधीच्या कामकाजाच्या ८ दिवसांत त्यांना सुनावणी घेऊन राखून ठेवलेले ६ महत्त्वाच्या प्रकरणांचे निकाल द्यावे लागणार आहेत. अयोध्येतील राममंदिराची उभारणी, शबरीमला मंदिरातील महिलांना प्रवेश, राफेलमधील कथित अपव्यवहार आदी महत्त्वाच्या निकालांचा अंतर्भाव …