कोरोनामुळे अमेरिकेत एका मासात ७ लाख १ सहस्र नागरिक बेरोजगार

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तेथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी हानी पोचली आहे. तेथील सरकारी आकडेवारीनुसार मार्च मासात ७ लाख १ सहस्र नागरिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे, तसेच बेरोजगारीचा दरही ४.४ टक्क्यांवर पोचला आहे

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ६५ सहस्रांहून अधिक जण मृत्यूमुखी

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ६५ सहस्र ८४१ जण मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या १२ लाख १८ सहस्र ११४ इतकी झाली आहे.

अमेरिकेतील भारतीय अभियंत्यांनी बनवले ६० पट स्वस्त ‘व्हेंटिलेटर्स’ !

कोरोनाग्रस्तांना ‘व्हेंटिलेटर’ची अत्यंत आवश्यकता असल्याने सध्या जगभरात ‘व्हेंटिलेटर्स’चा तुटवडा भासत आहे. एकट्या अमेरिकेत ७ लाख ‘व्हेंटिलेटरर्स’ची आवश्यकता आहे.

कोरोनामुळे अमेरिकेत मृत्यूचे थैमान चालूच, १ लाख शवपेट्यांची मागणी

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगान होत आहे. अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाख ४५ सहस्र ८८ इतकी झाली असून मृतांची संख्या ६ सहस्र ७५ झाली आहे.

जगभरात कोरोनामुळे मृतांची संख्या झाली ४९ सहस्र २४२ !

जगभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून सध्या अमेरिका आणि युरोप हे खंड कोरोनाचे केंद्र बनले आहेत.

कोरोनामुळे १ कोटी १० लाख नागरिक गरिबीच्या दिशेने वाटचाल करतील ! – जागतिक बँकेची चेतावणी

जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात सांगितले आहे की, कोरोनामुळे चीन आणि पूर्व आशिया भागात अर्थव्यवस्थेची वृद्धी धिम्या गतीने होईल. ज्यामुळे १ कोटी १० लाख नागरिक गरिबीच्या दिशेने वाटचाल करतील.

वैद्यकीय सुविधांसाठी अमेरिकेकडून भारताला २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य

अमेरिकेने भारतासह अन्य ६४ देशांना १३ अब्ज रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला २.९ मिलियन डॉलरर्स, म्हणजेच २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य मिळणार आहे.

कोरोनामुळे अमेरिकेत होऊ शकतो ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू ! – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. प्रतिदिन येथे बाधित आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

भारतात अडकलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ करणार ! – अमेरिका

भारतात दळणवळण बंदी घोषित झाल्यानंतर भारतातून विदेशात जाणार्‍या विमानांची उड्डाणेे रहित करण्यात आली आहेत. त्यामुळे नवी देहली, मुंबई यांसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमेरिकी नागरिक अडकले आहेत.

अमेरिकेत शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी सिद्ध केले लंगर (अन्नदान)

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक वैद्यकीय कर्मचारी रात्रं-दिवस झटत आहेत. अशा कर्मचार्‍यांना साहाय्य म्हणून आणि खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी लंगर (अन्नदान) म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे सिद्ध केली आहेत.