अन्नग्रहण करण्याची कृती आणि यज्ञकर्म यांतील साम्य

हिंदु धर्मात अन्नग्रहण करण्याच्या कृतीला यज्ञासमान मानले आहे. त्या संदर्भात सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०१५, सायं. ७.३०)

धर्मग्रंथांनी अन्न ग्रहण करण्याच्या कर्माला यज्ञाची उपमा देऊन दोघांमध्ये असणारे साम्य दर्शवलेले असणे

कु. मधुरा भोसले

सारणी स्वरूपातील वरील आशय संतांनी मराठीतून आणि धर्मग्रंथांनी संस्कृत श्‍लोकांतून संक्षिप्तपणे सांगितलेला आहे.

२ अ. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
– दासबोध

अर्थ : मनुष्याने अन्नाचा ग्रास घेतांना भगवंताचे नामस्मरण करावे. भगवंताचे नामस्मरण केल्याने सहज हवन होते. जीवनाला जीव प्रदान करणारे अन्न हे पूर्णब्रह्मस्वरूप आहे; त्यामुळे भोजन करण्याचे कर्म नुसते पोट भरणे नसून ते एकप्रकारचे यज्ञकर्मच आहे.

२ आ. अहं वैश्‍वानरौ भूत्वा प्राणिनां देहमाश्रित:।
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥

अर्थ : मीच वैश्‍वानर (अग्नीचे एक रूप) बनून प्राणिमात्रांच्या देहात आश्रय घेतो आणि मी प्राणतत्त्वाने युक्त असणार्‍या अन्नाचे पचन करण्याचे कार्य करतो, असे भगवंत म्हणतो.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०१५, सायं. ७.५०)

धर्माच्या अभ्यासकांना विनंती !

सनातन प्रभातमध्ये प्रकाशित होणारे साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य कि अयोग्य, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, यांचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा ! : आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला योग्य कि अयोग्य ?, असे म्हणता येत नाही. ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?, यासंदर्भात, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात (उदा. उच्च लोक, पंचमहाभूते यांच्याविषयीच्या अनुभूतींच्या संदर्भात) धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर अयोग्य काय ?, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.
– संपादक, सनातन प्रभात

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now