इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना ठार करण्याचा कट रचणार्‍या दोघा आतंकवाद्यांना अटक !

थेरेसा मे

लंडन – इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना बॉम्बस्फोटात उडवून देण्याचा कट रचणारे आतंकवादी नैमूर झकेरिया रेहमान (वय २० वर्षे) आणि महंमद आकीब इम्रान (वय २१ वर्षे) यांना लंडन पोलिसांनी अटक केली आहे. (आतंकवाद्यांना धर्म नसतो; मात्र बहुतेक आतंकवादी एकाच धर्माचे असतात ! – संपादक) नैमूरला लंडनमधून, तर महंमदला बर्मिंगहॅम भागातून अटक केली आहे. या दोघांनी मे यांचे निवासस्थान असलेल्या १० डाऊनिंग स्ट्रीटवर स्फोटके पेरायची आणि नंतर त्याचा स्फोट घडवायचा. यामुळे होणार्‍या गोंधळामध्ये मे यांना ठार करायचे, असा कट रचला होता.