गुन्हेगारीचा देश ?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने सिद्ध केलेला देशातील गुन्हेगारीवरील आकडेवारीचा क्राइम इन इंडिया २०१६ नावाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकताच प्रसिद्ध झाला. यात गुन्हेगारीमध्ये देशाच्या राजधानीने अग्रभागी स्थान मिळवले आहे. देहली हे सर्वांत असुरक्षित शहर ठरले असून एकूण देशातच गुन्ह्यांच्या नोंदींची संख्या १ लक्ष २० सहस्रांनी वाढली आहे. यामध्येही बलात्कार, महिलांवरील अत्याचार, अपहरण, पती अथवा सासरची मंडळी यांकडून छळ, हे प्रकार वाढले आहेत.

त्यामुळेच की काय, पण साडे तीन वर्षांपूर्वी सरकार पालटले, मात्र नैतिकतेचे राज्य अजून काही येत नाही, असा गंभीर प्रश्‍न देशासमोर उभा ठाकला आहे. मूलत: अशा गुन्हेगारी वृत्तीच्या मुळाशी गेले, तर कळेल की, आज ना शासनकर्ते धर्माचरणी आहेत, आणि ना जनता ! ईश्‍वराचे भय राहिले नाही, हेच या अव्यवस्थेचे नि अराजकतेचे मूळ कारण आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या शासनाने तरी या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी पातळीवरून जनतेला धर्माचरणी बनवण्यासाठी योजना आखणे गरजेचे आहे. आपली व्यवस्था किडामुंगीसारखी आहे, तर ईश्‍वरी व्यवस्था अनंत कोटी ब्रह्मांडे व्यवस्थित सांभाळते. त्यामुळे शासनकर्त्यांनी याचा अंतर्मुखतेने विचार करून धर्माचरणाची कास धरायला हवी.

– श्री. नीलेश देशमुख, नवी मुंबई.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now