बांगलादेशमध्ये प्रशासन आणि पोलीस यांच्या साहाय्याने हिंदूंच्या मंदिरांना कह्यात घेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

बांगलादेशातील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण होण्यासाठी भारत सरकार काही करत नाही, हे लक्षात घ्या !

ढाका – नारायणगंज जिल्ह्यातील पागला बाझार येथील श्री बाबा पागलनाथ आणि श्रीराम-सीता मंदिर यांना बळजोरीने कह्यात घेण्यासाठी जातीय श्रमिक लीग या कट्टरवादी धर्मांध संघटनेचे सचिव अल्हाज कौसर अहमद पोलाश याने स्थानिक पोलीस आणि महसूल उपायुक्त यांच्या साहाय्याने प्रयत्न चालू केले आहेत.

१. ज्या भूमीवर वरील मंदिरे अस्तित्वात आहेत ती भूमी मंदिराचे सेवेकरी डेबू दास मोहंत दास यांच्या मालकीची असून तिच्यावर अल्हाज पोलाश याचा अनेक दिवसांपासून डोळा होता. यासाठी त्याला ६ धर्मद्रोही हिंदूंची साथ मिळत होती. (असे जन्महिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! – संपादक) या मंदिराचा कारभार एक अध्यक्ष, सचिव आणि २९ सदस्य असलेली व्यवस्थापन समिती बघत आहे.

२. अल्हाज पोलाश याचा मंदिर कह्यात घेण्याचा कट लक्षात आल्यावर व्यवस्थापन समितीने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून मंदिरात होणार्‍या अतीक्रमणाविरुद्ध स्थगिती आदेश प्राप्त केला होता. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०१७ या दिवशी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशाने कुणीही मंदिरात अनधिकृत प्रवेश करू नये, असा आदेश पारित केला होता. तरीही वरील ६ हिंदूंचे, तसेच स्थानिक पोलीस आणि महसूल उपायुक्त यांचे साहाय्य घेऊन मंदिरात बळजोरीने घुसण्याचा प्रकार घडला. तेथील कुलुपे तोडून सेवेकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. तसेच मंदिरातील सध्याच्या व्यवस्थापन समितीचा फलक काढून तेथे उपायुक्त महंमद रबी मिया यांच्या अध्यक्षतेखाली नव्या व्यवस्थापन समितीचा फलक लावण्यात आला. या घटनेची तक्रार स्थानिक फातुल्ला पोलीस ठाण्याचे प्रभारी महंमद कमालूद्दिन यांनी स्वीकारून गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. (भारतातील हिंदू पोलीस हिंदूंच्या अशा तक्रारी नोंद करून घेण्यास विरोध करतात, तसाच प्रकार मुसलमानबहुल बांगलादेशातही घडतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)

३. बांगलादेशमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेश मायनॉरीटी वॉच या संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी १ डिसेंबर या दिवशी घटनास्थळी भेट दिली.  तेथील तोडफोड बघितली. तसेच स्थानिक पोलीस अधिकारी आणि महसूल उपायुक्त यांच्याशी संपर्क केला. या दोघांनीही काही बोलण्यास नकार दिला. अधिवक्ता घोष यांनी झालेल्या घटनेविषयी तीव्र निषेध केला. या घटनेस उत्तरदायी असणार्‍या सर्व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.