(म्हणे) ‘फसवणुकीची २५ वर्षे विसरू नका, बाबरी मशीद बांधा !’

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा येथे भित्तीपत्रके

उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा येथे भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारची भित्तीपत्रके लावण्याचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या काही शहरांमध्ये बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी करणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. या पत्रकाद्वारे बाबरी मशीद उभारणीसाठी आंदोलन चालू करण्याचे संकेत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफ्आय) या संघटनेने दिले आहेत. ‘कहीं हम भूल न जाएं, धोखे के २५ साल, बाबरी मस्जिद की दोबारा तामीर करो।’, (फसवणुकीची ती २५ वर्षे विसरायला नको, बाबरी मशीद पुन्हा उभारा !) असे या भित्तीपत्रकांवर लिहिण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोंढवा आणि गोव्यातील मडगाव येथेही अशा प्रकारची भित्तीपत्रके पीएफ्आयने लावली आहेत.

१. ही भित्तीपत्रके मेरठ, गाझियाबाद, अलीगड, हाथरस आणि सहारणपूर येथे लावण्यात आली आहेत.

२. उत्तरप्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत मेरठमधील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) प्रविष्ट केला आहे.

३. भित्तीपत्रकांच्या खाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया लिहिले आहे. त्याचा पत्ता ‘जी-७८, दुसरा मजला, शाहीन बाग, कालिंदी कुंज रोड, नवी देहली’, असा लिहिलेला आहे.

४. मेरठच्या लिसाडी गेट, कोतवाली आणि ब्रह्मपुरी या मुसलमानबहुल भागांत ही भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत.

५. विशेष पोलीस अधीक्षक मंजिल सैनी म्हणाले की, भित्तीपत्रके हटवली असून ती लावणार्‍यांचा शोध चालू आहे. धार्मिक भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.

६. पीएफ्आयचे उत्तरप्रदेशातील काही कार्यकर्ते देहलीमध्ये आंदोलन करतील, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.