शिवसेनेने श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावला !

फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिलेल्या आव्हानाला उत्तर !

असे धाडस केवळ शिवसेनाच करू शकते !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिलेल्या आव्हानाला उत्तर देत शिवसेनेने ६ डिसेंबरला श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. तसेच त्यांनी अब्दुल्ला यांच्या विरोधात घोषणाबाजी केली; मात्र यानंतर पोलिसांनी ६ ते ९ शिवसैनिकांना कह्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. ते सर्व जम्मूचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाल चौक, श्रीनगर

२७ नोव्हेंबरला अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला ‘आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा’, असे आव्हान दिले होते. ‘तुम्ही लाल चौकात तिरंगा फडकवू शकत नाही आणि पाकव्याप्त काश्मीरविषयी बोलतात’, असे ते म्हणाले होते.

शिवसेनेचे जम्मू प्रदेशाध्यक्ष डिंपी कोहली आणि सरचिटणीस मनिष साहनी यांनी यापूर्वी ‘शिवसेना लाल चौकात तिरंगा फडकावणार आहे. यासाठी पक्षाचे एक विशेष पथक काश्मीरला रवाना झाले आहे’, अशी माहिती दिली होती.