बहराईच (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर आक्रमण !

•  अनेक घरे, दुकाने, वाहने यांची तोडफोड  •  धर्मांधांकडून तलवारी जप्त

उत्तरप्रदेशातील भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! धर्मांधांची ही असहिष्णुता पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना दिसत नाही का ?

बहराईच (उत्तरप्रदेश) – येथील नानपारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या गुरगुट्टा गावामध्ये प्रत्येक वर्षी ‘बारावफात’ या सणाच्या वेळी मुसलमानांकडून मिरवणूक काढली जाते. २ डिसेंबरला अशीच मिरवणूक काढण्यात आल्यावर त्याचा नियोजित मार्ग पालटून ती हिंदूबहुल भागातून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावर हिंदूंनी त्याला विरोध केला. (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी नेहमीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो; मग अशा मिरवणुकांच्या वेळी तो का नसतो ? – संपादक) यानंतर झालेल्या वादातून मिरवणुकीत सहभागी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. हिंदूंची अनेक घरे, दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली, तसेच लुटमार केली. हिंदु महिलांची छेड काढण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीत काही जण घायाळ झाले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी १५ धर्मांधांना अटक केली आहे. धर्मांधांच्या घरातून हिंदूंचा लुटलेला ऐवज आणि तलवारी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या.