भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्पाचा अर्थ पुरवठा रोखला

बीजिंग – चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या अंतर्गत येणार्‍या ३ मोठ्या प्रकल्पांचा आर्थिक पुरवठा भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर चीनने थांबवला आहे. डेरा इस्लाइल खान-झोब रोड, खुजदार-बसिमा रोड, रायकोटपासून थाकोटला जाणारा काराकोरम महामार्ग हे ३ मोठे प्रकल्प यामुळे थांबणार आहेत.  आता चीनकडून नव्या नियमावलीनुसार या योजनेसाठी अर्थपुरवठा केला जाणार आहे. हा प्रकल्प चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वन बेल्ट वन रोडचा महत्त्वपूर्ण भाग आहे. चीनच्या या योजनेला भारताने आधीपासूनच विरोध केला आहे. हा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. या माध्यमातून चीनला अरबी सुमद्राला जोडण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे. आर्थिक महामार्गासाठी चीनकडून ३ लाख ८६ सहस्र कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.