ब्रिटीश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी क्षमा मागावी ! – लंडनचे महापौर सादिक खान

भारतातील एकतरी राजकारणी, मंत्री किंवा पंतप्रधान अन् राष्ट्रपती असे कधी म्हणतात का ?

लंडनचे महापौर सादिक खान

अमृतसर – ब्रिटीश सरकारने वर्ष १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बागेतील हत्याकांडासाठी क्षमा मागायलाच हवी. या घटनेसाठी क्षमा मागण्याची वेळ आली आहे, असे मत लंडनचे महापौर सादिक खान यांनी व्यक्त केले. भारताच्या दौर्‍यावर असणारे सादिक खान यांनी अमृतसर येथे जाऊन जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर येथे भेट देणार्‍यांसाठीच्या नोंदवहीमध्ये त्यांनी वरील मत व्यक्त केले. ‘येथे झालेला नरसंहार हा भयानक होता, कोणीही ती घटना विसरू शकत नाहीत’, असेही त्यांनी यात लिहिले.