बांगलादेशमध्ये रोहिंग्या मुसलमान शरणार्थींना भेटल्यावर पोप फ्रान्सिस रडले !

दुसर्‍यांचे दुःख पाहून रडणारे पोप यांनी भारतात ख्रिस्ती मिशनरींकडून हिंदूंचे आमीष दाखवून केल्या जाणार्‍या धर्मांतराविषयीही बोलावे, असे वाटते ! ख्रिस्ती नक्षलवाद्यांच्या हिंसाचारावरही बोलावे. तसेच भारतात, विशेषतः गोव्यामध्ये क्रूर अत्याचारांद्वारे हिंदूंच्या झालेल्या बाटवाबाटवीविषयीही बोलावे, असे वाटते !

व्हॅटिकन सिटी – नुकतेच बांगलादेशच्या दौर्‍यावर गेल्यावर तेथील शरणार्थी रोहिंग्या मुसलमानांची भेट घेतल्यावर पोप फ्रान्सिस यांना रडू आल्याचे त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले, मी रडलो, मी अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हटले की, तुम्हाला ज्यांनी त्रास दिला, तुमची हानी केली, जगाने तुम्हाला साहाय्य केले नाही, तरी यावर तुम्ही त्यांना क्षमा करावी.