अग्नीचे गुणधर्म जोपासणारे ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण !

श्री. राम होनप

१. अग्नीची गुणवैशिष्ट्ये

१ अ. अग्नीला देवतांचे मुख मानले जाते त्यामुळे यज्ञकुंडातील अग्नीमध्ये अर्पण केलेल्या आहुती संबंधित देवतांपर्यंत विनासायास पोहोचतात.

१ आ. दाहकता, अर्थात धगधगत रहाणे हा अग्नीचा गुणधर्म आहे.

१ इ. अग्नीमुळे प्रकाश आणि उष्णता रुपी ऊर्जा प्राप्त होतात.

१ ई. अशुद्धतेचे भक्षण करून शुद्धता प्रदान करणे, हे अग्नीचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे.

१ उ. अग्नीज्वालेचा प्रवास अधस् दिशेतून उर्ध्व दिशेकडे असतो. त्यामुळे अग्नी हा उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती करण्याचे सूचक आहे.

कु. मधुरा भोसले

२. अग्नीचे गुणधर्म जोपासणारे ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण !

२ अ. अग्नीचा ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांशी असणारा संबंध : ब्राह्मण वर्णाची निर्मितीच तेजापासून झाल्याने चतुर्वर्णात ब्राह्मणांमध्ये विशुद्ध अग्नीचे प्रमाण सर्वाधिक आहे. क्षत्रियांमध्ये तेजाचे प्राकट्य अधिक प्रमाणात झाल्याने अन्य वर्णांपेक्षा क्षत्रिय वरचढ असतात.

२ आ. क्षत्रिय आणि ब्राह्मण या वर्णांनुसार अग्नीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये  

१. अग्नीचे स्वरूप

२. अग्नीचे प्रमाण

३. अग्नीचे प्राकट्य

४. अग्नीचा साकारणारा गुणधर्म

५. कार्याशी संबंधित देह

६. अग्नी जागृत झाल्याने कार्यरत होणारी स्थूल आणि सूक्ष्म इंद्रिये

पहिली विचारसरणी : कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०१६ रात्रौ ९.२०)

दुसरी विचारसरणी : श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०१७)