धर्मप्रसारासाठी शासन अधिग्रहित मंदिरांतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील फलक उपलब्ध !

साधकांना सूचना !

सध्या विविध ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. सभांसह गुरुपौर्णिमा, सत्संग सोहळे इत्यादी ठिकाणी लावण्यासाठी शासन अधिग्रहित मंदिरांतील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करणा ३ फूट × ४.५ फूट आकारातील ६ फ्लेक्स फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि तुळजापूर येथील श्री भवानीमंदिर येथील भ्रष्टाचार अन् त्याविरुद्ध देण्यात आलेल्या यशस्वी लढ्याची प्रबोधनात्मक माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रदर्शने आणि धर्मजागृती सभा यांच्या नियोजनानुसार जिल्हासेवकांना विचारून या फलकांचे मुद्रण करण्याचे नियोजन करावे.