उपास्यदेवता आणि देवी यांतील भेद

श्री. राम होनप

१. श्री. राम होनप

१ अ. उपास्यदेवता : ही देवता मनुष्याचे हित चिंतणारी असते. साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक आणि व्यावहारिक जीवन जगण्यासाठी किमान गरजांची पूर्तता व्हावी, यांसाठी ती पूरक असते. उपास्यदेवतेच्या साधनेने साधक मायेतून मुक्त होतो. ती गुरूंची भेट घडवून आणण्यास साहाय्य करते. थोडक्यात मनुष्य जीवनाचे आध्यात्मिकदृष्ट्या सार्थक करण्याचे कार्य उपास्य देवता करते.

१ आ. देवी : देवीला वरदायिनी असे म्हणतात. मनुष्याने जे काही देवीकडे मागितले, त्याची ती पूर्तता करते; कारण इच्छित गोष्टी साध्य करण्यासाठी साधकाने ठराविक साधना केलेली असते. त्या साधनेवर प्रसन्न होऊन देवी साधकाची इच्छित मनोकामना पूर्ण करते; परंतु असे केल्याने साधक मायेत अडकू शकतो. साधकाने सकाम अथवा निष्काम ज्या उद्देशासाठी देवीची उपासना केली, त्यानुरूप देवी त्याला त्याचे फळ देते.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०१७)

कु. मधुरा भोसले

२. कु. मधुरा भोसले

२ अ. उपास्य देवतांचा वर्ण भिन्न असल्यामुळे त्या विविध वर्णांशी संबंधित असणे : उपास्य देवतांच्या वर्णानुसार संबंधित वर्णातील व्यक्ती त्यांची उपासना करतात. उदा. शूद्रदेवतेचा वर्ण शूद्र, वैश्‍वेदेव आणि कुबेर यांचा वर्ण वैश्य, इंद्रादी देवतांचा वर्ण क्षत्रिय आणि अग्नीदेव अन् उच्च देवता यांचा वर्ण ब्राह्मण आहे. विविध वर्णांच्या देवतांप्रमाणे संबंधित वर्णातील (जातीतील नव्हे) व्यक्तींना त्यांची उपासना करावीशी वाटते.

२ आ. देवींकडून प्रक्षेपित होणारी शक्ती भिन्न असणे आणि त्या कार्यानुमेय विविध कामनांची पूर्ती करू शकणे : देवींची उपासना त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि पूर्ण होणारी मनोकामना यांच्याशी संबंधित आहे. देवी त्यांच्या कार्यानुरूप शक्ती प्रक्षेपित करून भक्तांच्या कामना पूर्ण करतात, उदा. लक्ष्मीच्या उपासनेने धनाची प्राप्ती होत असल्याने धनाची कामना मनात असणार्‍या वैश्य वर्णातील व्यक्तींकडून तिची आराधना केली जाते. त्याचप्रमाणे शक्ती प्राप्त करण्याची मनोकामना असणार्‍या क्षत्रिय वर्णातील व्यक्तींकडून शक्तीस्वरूपिणी श्री दुर्गादेवीची उपासना केली जाते. ब्राह्मण वर्णातील व्यक्तींच्या मनात ज्ञानप्राप्तीची कामना असल्याने ती पूर्ण करणार्‍या

श्री सरस्वतीदेवीची उपासना त्यांच्याकडून केली जाते. विविध वर्णातील व्यक्तींना त्यांच्या वर्णांशी संबंधित आणि कामनापूर्ती करणार्‍या देवतांची उपासना करण्याची प्रेरणा मिळत असते.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०१७, रात्री १०.३५)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now