विजय मल्ल्या यांना भारतात आणण्याच्या प्रयत्नात अडचणी ! – अरुण जेटली

मल्ल्या भारत सरकारचे अपराधी आहेत. त्यामुळे त्यांना कह्यात घेणेे सरकारचे दायित्व आहे. सरकारने अशी हतबलता व्यक्त करणे शोभत नाही.

नवी देहली – विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न अवघड आहे, अशी स्वीकृती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, इंग्लंडचे कायदे अन्य देशांतील कारागृहांविषयी वेगळ्या दृष्टीने पहातात; म्हणून ते भारतातील कारागृहांच्या स्थितीचा उल्लेख करत गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याचे स्वीकारत नाही.

यापूर्वी सट्टेबाज संजीव चावला याला ब्रिटनने भारताच्या कह्यात देण्याचा विरोध केला होता. त्या वेळी चावलाने भारतातील कारागृहांच्या दुःस्थितीविषयी न्यायालयात सूत्र उपस्थित केले होते. तोच भाग आता मल्ल्या यांनी केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF