आधुनिक वैद्यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी उपाययोजना करा !

‘मेडिकोस लिगल अ‍ॅक्शन गटा’ची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई – ‘कोणतेही निमित्त करून आधुनिक वैद्यांना लक्ष्य केले जाते अन् त्यांच्यावर आक्रमण केले जाते. हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात’, अशी मागणी ‘मेडिकोस लिगल अ‍ॅक्शन गटा’ने सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मेडिकोसचे अध्यक्ष डॉ. नीरज नागपाल याविषयी म्हणाले की,

१. दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील होलिक्रॉस रुग्णालयाची एका रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड करून ‘अ‍ॅसिड’च्या बाटल्या फेकल्या. आधुनिक वैद्यांना २ घंटे ओलिस ठेवले.

२. गेल्या २ वर्षांत आधुनिक वैद्यांवर ४० हून अधिक प्रकरणांमध्ये आक्रमण करण्यात आले. याच्या विरोधात आंदोलने, निदर्शने केली आणि निवेदनेही दिली; मात्र तरीही केंद्र सरकारकडून आधुनिक वैद्यांना न्याय मिळत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक वैद्यांच्या वेदना समजून न्याय द्यावा. (आंदोलने करूनही न्याय देऊ न शकणारी यंत्रणा लोकशाही निरर्थक ठरवते ! – संपादक)

३. आधुनिक वैद्यांविषयी समाजामध्ये अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने त्यांची मानहानी केली जाते. याची गंभीर नोंद घेण्याची वेळ आली आहे. (आधुनिक वैद्यांवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे; मात्र समाजात आधुनिक वैद्यांविषयी अविश्‍वासाचे वातावरण का निर्माण झाले, याचाही विचार होणे आवश्यक आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF