मॅगीमध्ये ‘अ‍ॅश’चे प्रमाण अधिक आढळल्याने नेस्ले आस्थापन आणि वितरक यांना ६२ लाख रुपयांचा दंड

लोकहो, तुमच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा खाद्यपदार्थांपासून सावध रहा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – उत्तर प्रदेशच्या दंडाधिकारी न्यायालयाने नेस्ले आस्थापन आणि वितरक यावर ६२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॅगी नूडल्सच्या नमुन्यात ‘अ‍ॅश’चे (राखेचे) प्रमाण अधिक आढळल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. लक्ष्मणपुरी येथील प्रयोगशाळेत वर्ष २०१५ मध्ये मॅगीचे काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये अहवाल आल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात ७ प्रकरणे प्रविष्ट करण्यात आली. याआधी वर्ष २०१५ मध्ये मॅगीत शिसाचे (लेडचे) प्रमाण अधिक आढळल्यामुळे मॅगी विक्रीवर ५ मासांची बंदी घालण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF