(म्हणे) ‘क्षमा मागूनही आनंद यादव यांना क्षमा न करणारा वारकरी उदार कसा ?’ – श्रीपाल सबनीस

संत तुकाराम महाराज यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करणारे साहित्यिक आनंद यादव यांचा माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना पुळका !

आनंद यादव

पुणे – आनंद यादव यांनी महाराष्ट्राला वाङ्मय श्रीमंती दिली; मात्र महाराष्ट्राने त्यांना करंटेपण आणि उपेक्षा दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणाच्या भावना दुखवायचे कारण नाही. क्षमा मागूनही आनंद यादव यांना क्षमा न करणारा वारकरी उदार कसा ? संतसाहित्य आणि वारकरी यांच्यामध्ये क्रौर्य आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करत माजी संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी वारकर्‍यांवर टीका केली. (‘संतसूर्य तुकाराम’ या पुस्तकात संत तुकाराम महाराज व्यसनी आणि दुर्गुणी होते, अशा आशयाचे लिखाण करणारे आनंद यादव यांनी वाङ्मय समृद्ध नाही, तर विकृत केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे श्रद्धास्थानांचे हनन नव्हे ! धर्मभावना आणि श्रद्धा काय असतात, हे साहित्यिक म्हणवून घेणार्‍यांना समजू नये, हे दुर्दैव ! वारकरी समाज आणि संतसाहित्य यांच्यामध्ये क्रौर्य असते, तर सबनीस असे विधान करण्यास धजावले असते का ? – संपादक) मेहता पब्लिशिंग हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रामीण साहित्य परिषद आणि यादव परिवार यांच्या वतीने आनंद यादव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. आनंद यादव : जीवन आणि साहित्य गौरव’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सबनीस बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF