मोराळे (जिल्हा सांगली) येथील दत्तभक्त भालचंद्र पाटील महाराज यांना जामीन संमत !

ऐन दत्तजयंतीच्या तोंडावर पोलिसांनी कारवाई केल्याचे प्रकरण

तासगाव, २ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील मोराळे येथील थोर दत्तभक्त श्री. भालचंद्र भिकाजी पाटील महाराज (वय ४८ वर्षे) यांना तासगाव पोलिसांनी ३० नोव्हेंबरला विविध कलमांखाली अटक केली होती. त्यांना एक डिसेंबर या दिवशी एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. दोन डिसेंबर या दिवशी त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना अगोदर न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामीन संमत करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF