परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ६ – ७ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रातील तोंडवळा आपोआप अधिक पिवळा झाल्याचे लक्षात येणे

‘साधारण ६ – ७ वर्षांपूर्वी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधिका आणि माझी बहीण कु. नीलिमा कुलकर्णी हिने मला परात्पर गुरु डॉक्टरांचे एक छायाचित्र भेट दिले होते. तेव्हा तिने मला सांगितले होते, ‘पूर्वी हे छायाचित्र सद्गुरु अनुराधाताई (सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांनी मला दिले होते आणि आज मी हे तुला देत आहे.’ नंतर ते छायाचित्र घेऊन मी वाराणसीला आले आणि ते वैयक्तिक ग्रंथ ठेवलेल्या एका खोक्यामध्ये ठेवले. अधून-मधून काही वेळा मी तो खोका उघडत होते; पण ६.६.२०१७ या दिवशी मी तो खोका उघडल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या त्या छायाचित्राकडे माझे लक्ष आकर्षित झाले. ते छायाचित्र पहातांना चांगले वाटले. तसेच त्यातील परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा आपोआप अधिक पिवळा झाल्याचे माझ्यासह येथील सनातन सेवाकेंद्रातील अन्य साधकांनाही लक्षात आले.’

– सौ. श्रेया प्रभु, सनातन सेवाकेंद्र, वाराणसी. (२.७.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now