तोंडी तलाक देणार्‍यास ३ वर्षांचा कारावास

केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक

केंद्र सरकारने आता ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातही कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – एखाद्या मुसलमानाने त्याच्या पत्नीस तोंडी तलाक दिल्यास त्याला ३ वर्षांचा कारावास भोगावा लागेल, असे विधेयक केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून बनवले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात तेे संसदेत संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. हा अजामीनपात्र गुन्हाही असणार आहे. तसेच दोषीला दंडही भरावा लागणार आहे. या दंडात्मक कारवाईची रक्कम दंडाधिकारी ठरवणार आहेत. या नव्या विधेयकाचे नाव ‘मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मॅरेज बिल’ असे असणार आहे. हे विधेयक सर्व राज्य सरकारांना पाठवण्यात आले आहे. राज्यांनी यावर त्यांचे मत लवकरात लवकर द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यानंतर तो अंतिम संमतीसाठी केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now