धार्मिक अनुष्ठान, पूजा, भस्म आणि आरती या संदर्भात न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही ! – सर्वोच्च न्यायालय

उज्जैन महाकालेश्‍वर मंदिराच्या शिवलिंगाचे प्रकरण

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर व्यवस्थापन समितीला मंदिराबाहेर लावण्यात आलेला फलक तात्काळ काढण्याचा आदेश दिला आहे. या फलकावर ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूजा करण्याचे नियम बनवण्यात आले आहेत’, असे लिहिण्यात आले आहे. यावर न्यायालयाने म्हटले, ‘‘आम्ही आदेश दिला नसतांना असा फलक कसा लावला जातो ? या फलकाचे छायाचित्र काढून न्यायालयाला सादर करा. आम्ही संबंधित उत्तरदायीच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानतेचा खटला चालवू. न्यायालयाने असे आदेश कधीच दिलेले नाहीत की, धार्मिक अनुष्ठान कसे करावे आणि भस्म आरती कशी करावी ? मंदिर आणि पूजा यांच्याविषयी न्यायालयाचा कोणताही संबंध नाही. न्यायालयाने केवळ शिवलिंगाच्या संदर्भातील याचिकेविषयी पक्षकारांचे मत ऐकले आणि तज्ञांची समिती नेमली. या तज्ञांच्या समितीच्या आधारे मंदिर समितीनेच अशा प्रकारचा प्रस्ताव सादर केला होता. जर अशा प्रकरणांत प्रसारमाध्यमे चुकीचे वार्तांकन करत असतील, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now